Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिंबागणेश पंचक्रोशीतील  पोखरी, बेलगाव , सोमनाथवाडी, पिंपरनई  नुकसानग्रस्त भागाची पाहणी

बीड प्रतिनिधी - तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीतील पोखरी, बेलगाव ,सोमनाथ वाडी ,पिंपरनई  गावात काल रात्री झालेल्या अवकाळी वादळी वार्‍यासह गारपिटीन

विश्‍वास कारखान्याच्या अध्यक्ष पदी आ. मानसिंगराव नाईक; उपाध्यक्षपदी माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर
संप संपल्यानंतर आज पासून होणार नुकसानीचे पंचनामे; ४० ते ४५  हेक्टर वरील पिकांचे नुकसान
बीजमाता राहीबाई पोपेरे यांची अनोखी दिवाळी; बियाणेरुपी दिवा आणि आरास करून साजरी

बीड प्रतिनिधी – तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीतील पोखरी, बेलगाव ,सोमनाथ वाडी ,पिंपरनई  गावात काल रात्री झालेल्या अवकाळी वादळी वार्‍यासह गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी तहसीलदार सुहास हजारे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप,कृषी अधिकारी व्हि.एस.गंडे, कृषी मंडळ अधिकारी श्रीमती तुरुकमाने,मंडळ अधिकारी वंजारे, तलाठी गणपत पोतदार , ग्रामसेवक वीर  केली असून तलाठी, ग्रामसेवकांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
काल दि.08 शनिवार रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळीवार्‍यासह गारपिटीने मोठ्या प्रमाणात घरावरील पत्रे उडून घरांचे नुकसान झाले आहे तर शेतातील कांदा,मिरची, टोमॅटो तसेच टरबुज,खरबुज सह आंब्याच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आज दुपारी 3 च्या सुमारास महसूल, पंचायत तसेच कृषी विभागातील अधिकार्‍यांनी  पोखरी (घाट);पिंपरनई , बेलगाव, सोमनाथवाडी गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत तलाठी, ग्रामसेवक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. झाडे उन्मळून पडली असून काही झाडे महावितरणच्या विद्यूत तारावर पडल्यामूळे तारा तुटल्या, रात्रीपासून गाव अंधारात असुन जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. बीड तालुक्यातील मौजे.सोमनाथवाडी येथील पहीली ते चौथी पर्यंत 23 मुले व 23 मुली अशी एकूण 46 विद्यार्थी असुन सन 1969 साली बांधण्यात आलेली दगडी बांधकाम असलेली शाळा जीर्णावस्थेत असुन काल रात्री झालेल्या पावसाने शाळेवरील पत्रे उडून गेले त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांची धांदल उडाली होती. मौजे.पिंपरनई ता.जि.बीड येथील शेतकरी अशोक वायभट यांच्या म्हशीचे वगारू गारपिटीने दगावले असुन पशुवैद्यकीय अधिकारी अमोल मोहरकर व पंचनामा करण्यासाठी तलाठी यांना कळवण्यात आले आहे. नुकसान झालेल्या गावांना भेटी देत नुकसानीची पाहणी करत तहसीलदार सुहास हजारे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व ग्रामसेवक यांना दिले.

COMMENTS