महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केलेल्या कोरोना हेल्पलाईनमध्ये जे पदाधिकारी व कार्यकर्ते फ्रंटलाइन वॉरियर्स आहेत, त्या सर्वांना रुपये 1 लाखपर्यंतचा मेडिक्लेम इन्शुरन्स पुरवण्याचा निर्णय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर केला.
अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केलेल्या कोरोना हेल्पलाईनमध्ये जे पदाधिकारी व कार्यकर्ते फ्रंटलाइन वॉरियर्स आहेत, त्या सर्वांना रुपये 1 लाखपर्यंतचा मेडिक्लेम इन्शुरन्स पुरवण्याचा निर्णय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर केला. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करून राज्यभरात जिल्हानिहाय हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.
रुग्णांना बेड मिळवून देणे, औषध उपलब्ध करणे, आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेड मिळवून देणे अशा अनेक कामांमध्ये राज्यातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत होत आहे.n महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कोरोना हेल्पलाईनमध्ये काम करणारे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते हे माझ्यासाठी फ्रंटलाईन योद्धे आहेत. ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातलगांना मदत करत आहेत. सध्याच्या दुसर्या लाटेत मध्ये काम करताना कोरोनाची लागण काहींना झाली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या फ्रंटलाईन योद्ध्यांना आम्ही रुपये एक लाखपर्यंतचा मेडिक्लेम विमा देणार आहोत, अशी माहिती अध्यक्ष तांबे यांनी दिली आहे. गेल्या वर्षीदेखील लॉकडाऊनमध्ये युवक काँग्रेसने गरजूंना अन्नधान्य, औषधे व तात्काळ सेवा अशी विविध प्रकारे मदत केली होती. राज्यभरात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरातून 25 हजार रक्तपिशव्या गोळा केल्या होत्या. हे मदतकार्य करताना महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या बर्याच पदाधिकार्यांना कोरोनाग्रस्तांची मदत करताना लागण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मेडिक्लेम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
COMMENTS