Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले बहूजन संस्कृतीचे जनक

जयभिम महोत्सव : साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केले मत

बीड प्रतिनिधी - सामंत व्यवस्थेत आणि भांडवली व्यवस्थेत सर्वदृष्टीने शोषण झालेले ’सर्वहारा’ लोक म्हणजे बहुजन, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक, धार्मिक

राष्ट्रवादीच्या यात्रेची आमदार काळेंकडून जय्यत तयारी
नवी मुंबईत 363 कोटींचे हेरॉईन जप्त
मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची कोठडी

बीड प्रतिनिधी – सामंत व्यवस्थेत आणि भांडवली व्यवस्थेत सर्वदृष्टीने शोषण झालेले ’सर्वहारा’ लोक म्हणजे बहुजन, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक, धार्मिक आणि जातीय, राजकीय आणि शैक्षणिक विषमतेमुळे आर्थिक शोषण झालेले लोक म्हणजे बहुजन आहेत. त्याकाळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी विषमतावादाला बडवित शोषण झालेल्या लोकांसाठी समाज जागृतीचे महान कार्य केलेले आहे. त्यामुळे बहुजन वर्गाने महात्मा फुले नीट समजून घेणे काळाची गरज आहे. असे मत प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गुरुवार (दि.6) रोजी  बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले या विषयावर आयोजित व्याख्यान मालेत उपस्थितांना संबोधित करताना डॉ. प्रल्हाद लुलेकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे लेख व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे तर प्रमुख पाहुणे कृषी विकास अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी व्ही. बी. देशमुख यांची उपस्थिती होती. उपस्थितांना संबोधित करताना डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले की,स्री-पुरूष विचार करताना फुले यांनी स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असल्याची सप्रमाण मांडणी केली होती. कुटुंब व्यवस्थेसंबंधी फुले यांची मते व्यापक समाजहिताचीच आहेत. ’विवाहपद्धतीतून परिवर्तन’, ’कामगार चळवळीचा प्रारंभ’, ’बलुतेदार-अलुतेदार सारे’, ’भटके आदिवासी’, ’सार्वजनिक सत्यधर्म’, ’साहित्यसंस्कृती संबंधीची भूमिका’, ’कृषी-औद्योगिक संस्कृती’, ’बहुजन संस्कृतीचे जनक’, तसेच आधुनिक भारतातील पहिले महान समाजक्रांतिकारक महात्मा जोतीराव फुले, यांच्याविषयी आजवर विपुल लेखन झालेले असले, तरी त्यांच्या चरित्रातील आणि कार्यातील अनेक पैलूंविषयी द्रष्ट्या संशोधकाला अजूनही नावीन्यपूर्ण गोष्टी मांडणे शक्य आहे. असे परखड मत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केले.   या व्याख्यान मालेचे प्रास्ताविक प्रकाश वक्ते यांनी केले.सूत्रसंचालन विश्वभुषण सोनवणे, आभार संतोष गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्यासह आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

COMMENTS