Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलावात पोहताना तलाठी मुडगूलवार यांचे निधन

भोकर प्रतिनिधी - मुदखेड तहसील अंतर्गत माळ कौठा सजाचे तलाठी नरेंद्र वसंतराव मुडगुलवार यांचा भोकर जवळील धानोरा तलावात पोहताना दुर्दैवी मृत्यू झाल्

अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक  : उपमुख्यमंत्री अजित पवार
अहिल्यादेवी होळकर यांचे मौजे चौंडी येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभारावे – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे
हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरून पडल्याने हैदराबादच्या मुलीचा मृत्यू

भोकर प्रतिनिधी – मुदखेड तहसील अंतर्गत माळ कौठा सजाचे तलाठी नरेंद्र वसंतराव मुडगुलवार यांचा भोकर जवळील धानोरा तलावात पोहताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
आज दि.1एप्रिल 2023रोजी भोकर जवळील धानोरा तलाव येथे सकाळी सहकार्‍या सोबत पोहण्यासाठी गेले असताना त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने दम कोंडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखद घटना घडली आहे. त्यांची उत्तरीय तपासणी भोकर ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात येऊन त्यांचे पार्थिव नातेवाईकांना देण्यात आले असून अंत्यविधी मुळगावी नारायणपेठ ता. घाटंजी जी.यवतमाळ येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ, पत्नी व सहा वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे.यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथील अव्वर सचिव राजेंद्र खंदारे, भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे, मुदखेड चे तहसीलदार तथा भोकरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी सुजित नरहरे, नायब तहसीलदार संजय सोलंकर, रेखा चामणर, मुदखेडचे नायब तहसीलदार  संजय नागमवाड अर्धापूरचे नायब तहसीलदार मारोती जगताप नायब भोकर मंडळाधिकारी महेश वाकडे तलाठी महेश जोशी, भोकर व मुदखेड तहसील चे बहुतांशी तलाठी, महसूल कर्मचारी यांच्या सह सेवा समर्पण परिवाराचे  अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, सचिव विठ्ठल फुलारी, व सर्व सदस्य  हे  उपस्थित होते.पूर्वी भोकर येथे तलाठी म्हणून जवळपास सहा वर्ष काम केल व नुकतीच मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे ते सध्या कार्यरत होते त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व सुशील असल्याने दोन्ही तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व सर्व सतरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS