Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

उन्हाळ्यात चेहऱ्याची घ्यायची काळजी

उन्हामुळे त्वचेवर खुप परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे, आवश्यक आहे. उन्हाळ्यात सकाळी उठल्यावरच काही टिप्स पाळल्या तर चेहरा दिव

गौतमीच्या आडनावावरून नवा वाद
विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाचा मृत्यू
नामको निवडणुकीत प्रगती पॅनलमध्ये सकल सोनार समाजाचा केवळ मतदाना साठी उपयोग…. 

उन्हामुळे त्वचेवर खुप परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे, आवश्यक आहे. उन्हाळ्यात सकाळी उठल्यावरच काही टिप्स पाळल्या तर चेहरा दिवसभर ताजेतवाने राहू शकतो.उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची, या संबंधीत महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.

चेहरा स्वच्छ ठेवणे: उन्हाळ्यात त्वचेवर साचणाऱ्या डस्टमुळे पिंपल्स आणि मुरुमे होतात. बेडशीटवर बसलेली धूळ रात्री चेहऱ्यावर जमते त्यामुळे सकाळी ती साफ करावी. सकाळी फेसवॉश किंवा क्लिन्जरने चेहरा स्वच्छ करायला विसरू नका.

टोनर वापरा: सकाळी उठल्यानंतर त्वचेला हायड्रेट करण्यासाठी टोनर लावा. तज्ज्ञांच्या मते, ते त्वचेची पीएच पातळी संतुलित करते. यासाठी तुम्ही नेहमी अल्कोहोल फ्री टोनर वापरावे.

मॉइश्चरायझर वापरा : उन्हाळ्यात त्वचेवर नमीपणा असतो पण अशा परिस्थितीतही मॉइश्चरायझरचा वापर करणे गरजेचे आहे. तुम्ही जेल सारखे मॉइश्चरायझर वापरुन उन्हाळ्यात तुमच्या सौंदर्य निखारु शकता.

अति मेक-अप करू नका : अनेक वेळा स्त्रिया हवामान लक्षात न ठेवता समारंभासाठी हेवी मेकअप करतात. उन्हाळ्यात केलेला अति मेक-अप घामामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब होऊ शकतो.अति मेक-अपचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळए फक्त हलक्या मेकअप टिपचे अनुसरण करा.

सनस्क्रीन वापरा: उन्हाळा असो किंवा हिवाळा वर्षभर सनस्क्रीन लावावा. उन्हाळ्यात, बहुतेक लोक उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावतात. पण सकाळी उठल्याबरोबर सनस्क्रीन लावण्यास त्वचा दिवसभर ताजेतवाने असू शकते.

COMMENTS