Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे बॅकफूटवर ; शिंदे, फडणवीसांची मागितली माफी

मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी नेमण्याचे निर्देश

जालना ः राज्य सरकारने मंगळवारी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर मनोज जरांगे बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. मंगळव

सगेसोयऱ्यांची 2 दिवसांत अंमलबजावणी करा
सरकारने मोटरसायकल दिली, पण पेट्रोल काढून घेतलं – मनोज जरांगे
मनोज जरांगे राज्यभर करणार रास्ता रोको

जालना ः राज्य सरकारने मंगळवारी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर मनोज जरांगे बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी आक्रमक पवित्रा घेत चौकशी होऊन जाऊ दे, मी देखील सर्व उघड करतो म्हणणारे जरांगे यांनी दुपारी मात्र नरमाईचा सुर घेत मनोज जरांगे यांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली आहे. मी आई-बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे शब्द मागे घेतो, असे जरांगे म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे जरांगे सरकारविरोधात सपशेल बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.
मनोज जरांगे यांनी आपल्या आमरण उपोषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आई-बहिणीवरून अपशब्द वापरले होते. त्यांच्या या शब्दांचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. सरकारनेही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली होती. परिणामी, मनोज जरांगे यांनी मंगळवारी एक पाऊल मागे घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली आहे. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राज्य सरकारने देखील आक्रमक पवित्रा घेतला असून, मंगळवारी विधानसभेत मनोज जरांगेंना कोणाचे पाठबळ आहे, याची चौकशी करा, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली. यावरून सभागृहात प्रचंड खडाजंगी झाली. महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय, अशी परिस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार? असा प्रश्‍न आशिष शेलारांनी उपस्थित केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी बोलतांना शेलार म्हणाले की, महाराष्ट्र बेचिराख करायची भाषा कोणी करत असेल तर त्या भूमिकेविरोधात विरोधक उभे राहतील, असा आमचा विश्‍वास आहे.

महाराष्ट्र बेचिराख करण्याची केवळ धमकी आहे का? यामागची भूमिका काय? त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का? याबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण, आता मराठा समाजाचीही बदनामी होत आहे, असेही ते म्हणाले. आम्ही शांततेत आणि शिस्तीत मोर्चे काढले. पण त्याला आता गालबोट लागत आहे. अन्य कोणत्याही समाजाला नख न लावता मराठा समाजाचे आरक्षण आणि हित जपले पाहिजे, अशी मागणी होती. परंतु, उपमुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरला, एकेरी उल्लेख केला. मानसन्मानाच्या बाबतीत फडणवीसांनी कधी ब्र काढला नाही. कायदा सुव्यवस्था, राज्य सरकार आणि भारताविरोधात फडणवीस कधी बोलत नाहीत. पण तरीही उपमुख्यमंत्र्यांना निपटून टाकण्याची भाषा केली जाते. एका मंत्र्यापासून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचले. हे चालले काय?, असा संतप्त प्रश्‍न शेलारांनी विचारला. या घटनेचा घटनाक्रम सरळ नाही. देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाल बोलले. सकाळी 9 वाजता भाजपला एका दिवसात संपवू असे एकजण म्हणाले. आणि दुसर्‍या दिवशी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली. याविरोधात कटकारस्थान आहे का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात पंतप्रधानांची सभा उधळून टाकू, असे म्हटले जात आहे. हा कटकारस्थानाचा भाग आहे. या विषयाची गंभीर नोंद घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले. आज या व्यक्तीला महत्त्व द्यायचे नाही. समाज आमच्याबरोबर आहे. हे सगळे घडवणारे मनोज जरांगे राहतात कुठे हे शोधले पाहिजे. तो कारखाना कोणाचा आहे हे शोधले पाहिजे. तिथे आलेली दगड कोणाच्या कारखान्यातील आहेत हे शोधले पाहिजे. या आंदोलनाला जेसीबी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यातून आले. या सगळ्यामागे एका व्यक्तीच्या समर्थनाची, पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, एका कारखान्याच्या मालकाची असेल तर एसआयटी लावा, अशी मागणी आशिष शेलारांनी यावेळी केली. आशिष शेलारांच्या या निवेदनानंतर विरोधी पक्षानेही भूमिका मांडली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सत्ताधार्‍यांना चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, सभागृहात गोंधळ वाढू लागल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज तहकूब केले. कामकाज सुरळीत सुरू झाल्यानंतर या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली.

कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही ः मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना इशारा – सरकार कोणालाही खुश करण्यासाठी खोटे आश्‍वासन देणार नाही. नोटिफिकेशनचा प्रश्‍न तुमच्या सर्वांच्या समोर आहे. त्यावर सहा लाख आक्षेप आले आहेत. त्यामुळे कोणालाही खुश करण्यासाठी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांची भाषा योग्य नाही. हे करा, ते करा, ही भाषा योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आरक्षण टीकरणार नाही याची चर्चा करत आहोत मात्र, का टीकणार नाही? याचे कारण कोणीही देत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

COMMENTS