मुंबई : मंत्रालयासमोर विष पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोमवारी दोन महिलांनी केला होता. मात्र पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करत, या दोन्ही महिलांना
मुंबई : मंत्रालयासमोर विष पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोमवारी दोन महिलांनी केला होता. मात्र पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करत, या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांनी विष प्राशन केल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यातील एका महिलेचा मंगळवारी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या महिलेवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांना या महिलेने प्राण गमावले आहे.
वारंवार खेटे घातल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने या महिलांनी सोमवारी दुपारी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शीतल गादेकर (रा. धुळे) यांचा जेजे रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबईच्या नवी मुंबईच्या संगीता डवरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. भूखंडासाठीचा लढा अयशस्वी ठरल्याने या दोघींनी मंत्रालयाबाहेर काल विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुपारी सव्वा एकच्या दरम्यान मंत्रालयाच्या मुख्य दरवाजावर दोन महिला पोहोचल्या अन् त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महिला वेगवेगळ्या ठिकाणांहून आल्या होत्या. यांपैकी शीतल गादेकर या धुळ्याहून तर संगीता डवरे ही महिला नवी मुंबईतून आली होती. एमआयडीसीमधील जागेबाबत फसवणूक झाल्याचा आरोप या महिलेने केला होता. यासाठी न्याय मिळावा म्हणून तिने वारंवार मंत्रालयात खेटे घातले होते. पण अद्यापही आपल्याला न्याय मिळाला नसल्याचे सांगत त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले. तर नवी मुंबईहून आलेल्या संगीता डवरे यांच्या पतीच्या आजारपणात रुग्णालयाचा जो खर्च आला होता, त्यामध्ये मोठी तफावत असून यातून आमची फसवणूक झाल्याचा आरोप या महिलेने केला होता. याबाबत वारंवार पोलिसांना माहिती देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या महिलेनं मंत्रालयात दाखल होत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर देखील जेजे रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
COMMENTS