Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रदर्शन झाल्याने आजपासून रमजान उपवासांना प्रारंभ

अहमदनगर/प्रतिनिधी ः गुरुवारी (23 मार्च) संध्याकाळी नगर शहरात चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे

शिर्डीत एक दिवसीय सौंदर्य स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन ः जयश्री रोहमारे
महापालिकेच्या स्मशानभूमीतील शवदाहिणीचा स्फोट | LOKNews24
कर्जतच्या वनक्षेत्रात हरणाची शिकार

अहमदनगर/प्रतिनिधी ः गुरुवारी (23 मार्च) संध्याकाळी नगर शहरात चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे. आज शुक्रवारी (24 मार्च) पहिला रोजा (उपवास) असणार आहे. चंद्रदर्शन होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या.

शांतता, प्रेम, बंधुभाव, त्याग व उपासनेचे प्रतीक असलेल्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजे करुन अल्लाहच्या इबादतमध्ये (प्रार्थनेत) असतात. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव पहाटे सूर्योदयपूर्वी सहेरी करुन उपवास धरतात व संध्याकाळी सूर्यास्ताच्यावेळी इफ्तार करुन उपवास सोडला जातो. यामध्ये संपूर्ण दिवसभर पाणी वा अन्न काही घेतले जात नाही. घरोघरी व मशिदीमध्ये कुरान पठण करुन मुस्लिम बांधव पाच वेळची नमाज अदा करीत असतात. रात्री तराहवीची विशेष नमाज अदा केली जाते. ज्यामध्ये कुराणच्या पारेचा समावेश असतो. नमाजनंतर मशिदीमध्ये जे पठण झाले, त्याचा अर्थ देखील मौलाना विषद करीत असतात. या महिन्यात मोठ्या प्रमाणात दान-धर्म केला जातो. गुरुवारी चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला असून, आज शुक्रवारी रमजानचा पहिला रोजा होणार आहे.

COMMENTS