Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचे दोन करडं ठार

बिबट्याचा धुमाकुळ सीसीटीव्ही कॅमेरात कैद

अहमदनगर प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे बंदिस्त गोठ्यात बिबट्याने शरकाव करत शेळीचे दोन करडं ठार केल्याची घटना घडली आहे. याम

ग्रामपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस जोमाने लढविणार ः नागरे
पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन
संजय शिंदे शिक्षणाची पताका वाहणारा वारकरी ः आमदार डॉ. लहामटे

अहमदनगर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे बंदिस्त गोठ्यात बिबट्याने शरकाव करत शेळीचे दोन करडं ठार केल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे २० हजार रुपये नुकसान झाले आहे. आश्वी खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्यालगत लक्ष्मण हनुमंता गायकवाड यांचा शेळ्याचा गोठा व वस्ती आहे. नेहमी प्रमाणे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गायकवाड हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून गोठ्याची पाहणी करत होते. यावेळी त्यांना शेळ्याची करडं घाबरलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फिरवून पाहिला असता एका बिबट्याने गोठ्यात येऊन एका करडावर हल्ला चढवल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत गोठ्याकडे धाव घेतली असता बिबट्याने तेथून पलायन केलेले होते.

COMMENTS