अहमदनगर प्रतिनिधी - जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसर्या दिवशी बुधवारी (दि.15 मार्च) शहरातील अ

अहमदनगर प्रतिनिधी – जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसर्या दिवशी बुधवारी (दि.15 मार्च) शहरातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपाला प्रतिसाद देत काम बंद ठेऊन आंदोलन करण्यात आले. या संपात महाविद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी, रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, लॉ कॉलेज शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र बालक मंदिर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहे.
धरणे आंदोलनात जुनी पेन्शनच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी प्रा. विलास वाळुंजकर, प्रा. राजेंद्र जाधव, प्रा. संजय जाजगे, प्रा. आप्पासाहेब पोमणे, प्रा. मोहन कांजवणे, प्रा. भाऊराव नाडेकर, प्रा. अर्चना काळे, प्रा. आरती साबळे, प्रा. दिपाली रक्ताटे, प्रा. प्रतिभा पवार, प्रा. प्रतिमा शेळके, प्रा. अनिता चव्हाण, महाराष्ट्र बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शेवाळे, नितीन कराळे, संतोष कानडे, रविंद्र वर्पे, सिताराम मुळे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या भाषणात जुनी पेन्शनची आग्रही मागणी करुन जो पर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही, तो पर्यंत संप सुरु ठेवण्याची भावना व्यक्त केली.
COMMENTS