Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी आणि वीज वितरण अधिकारी यांच्यामध्ये अड.प्रताप ढाकणे यांनी घडवून आणली चर्चा

पाथर्डी प्रतिनिधी - तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या कृषी पंपांच्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी तालुक

डॉ. एम. एस. हरणे यांना भारत सरकारचे पेटंट बहाल
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
तालुक्यातील घुमटवाडी येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि स्पर्धाचे आयोजन

पाथर्डी प्रतिनिधी – तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या कृषी पंपांच्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी तालुक्यातील विविध भागातील प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून ग्रामीण भागातील वीज वितरण संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणली.तसेच पदाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विविध तक्रारींचे निराकरण पंधरा दिवसात करू मात्र त्यासाठी विज बिल वसुलीला सहकार्य करण्याचे आवाहन केले.  

            बुधवारी दुपारी प्रतापराव ढाकणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ग्रामीण भागातील वाढत्या वीज कनेक्शन तोडीच्या संदर्भात तसेच कृषी पंपाच्या जोडणीच्या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत प्रतापराव ढाकणे यांनी तालुक्यातील सर्वच भागातील प्रमुख ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांना बोलावून महावितरणचे ग्रामीण उपअभियंता संजय माळी यांच्या समवेत बैठक घडून आणली.

    यामध्ये महावितरण कंपनीकडून कोणतीही नोटीस न देता वीज पुरवठा खंडित केला जातो.मुदत संपल्यानंतर विज बिल दिली जातात.कृषी पंपाचा वीजपुरवठा रात्री होत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.काही भागात वायरमन कर्मचारी यांच्याकडून दुजाभाव करत कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो.अशा अनेक प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांनी या बैठकीत मांडल्या.

       यावर प्रतापराव ढाकणे यांनीही याच अनुषंगाने मध्यस्थी घडवत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.त्यावर उप अभियंता संजय माळी यांनी बैठकीत आलेल्या तक्रारींचा दखल घेत खंडित असलेला कृषी पंपांचा तसेच गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करून असे सांगून शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी विज बिल भरण्याचे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, युवकचे तालुका अध्यक्ष महारुद्र कीर्तने,माझे जि प सदस्य ज्ञानदेव केळगद्रे,माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार,रामराव चव्हाण,किरण खेडकर,मा.जि. प.सदस्य उज्वला शिरसाठ,पांडुरंग शिरसाठ,नवनाथ चव्हाण,रामराव चव्हाण,बंडू बोरुडे,वैभव दहिफळे, राजेंद्र नागरे,अतिश निराळी,योगेश रासने,देवा पवार अक्रम आतार,हुमायून आतार,अनिल ढाकणे डॉ. राजेंद्र खेडकर,दिगंबर गाडे,अंबादास राऊत,वृद्धेश्वर 

कंठाळी,रोहित पुंड,शंकर बडे आदी शेतकरी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS