Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहंभाव दूर ठेवून डॉक्टरांनी रुग्णसेवा केली पाहिजे – डॉ. दीपक रानडे

शिर्डी/प्रतिनिधी ः उॉक्टरांनी पैसा सर्वस्व न मानता, आणि स्वतःतील अहंभाव दूर करून तेवढ्याच विश्‍वासाने रुग्णाच्या श्रद्धेला अधिक महत्त्व देऊन रुग्

सविता पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार  
सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई व्हावी
देशसेवा व समाज कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा – हरिभाऊ डोळसे

शिर्डी/प्रतिनिधी ः उॉक्टरांनी पैसा सर्वस्व न मानता, आणि स्वतःतील अहंभाव दूर करून तेवढ्याच विश्‍वासाने रुग्णाच्या श्रद्धेला अधिक महत्त्व देऊन रुग्णसेवा केली पाहिजे असे प्रतिपादन पुणे येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे न्यूरो विभागप्रमुख व प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. दीपक रानडे यांनी केले आहे. प्रख्यात निरो सर्जन डॉ. दीपक रानडे यांचा एकरूखे ग्रामस्थांच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.  
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. जी. गुंजाळ होते. सरपंच जितेंद्र गाढवे, उपसरपंच जगन्नाथ सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवेंद्र भवर, डॉ. रवींद्र गोर्ड, तलाठी ज्योती कव्हळे, पंचकृष्णा डेअरीचे सुनील सदाफळ, माजी उपसभापती जालिंदर गाढवे,, माजी सरपंच दिलीप सातव तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर सातव ,डॉ अविनाश  सातव. आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निरो सर्जन दीपक रानडे त्यांच्या सुविद्य पत्नी सोनल रानडे  एकरुखे गावात आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत वज्रेश्‍वरी दर्शन झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर एका शानदार कार्यक्रमात डॉ दीपक रानडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ते म्हणाले या सत्काराने भारून गेलो असून खरंतर मी एवढा मोठा माणूस नाही, परंतु या सत्काराने माझे डोळे पाणवले आहे. एक कौटुंबिक जिव्हाळा व नात असल्याने एकरुखे गावात एवढा मोठा माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपले ऋणी आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच जितेंद्र गाढवे बाजार समितीचे संचालक देवेंद्र भवर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पी  जी गुंजाळ यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला रामभाऊ घनगाव, ललित मुनावत, अरुण सापिके, प्रमोद धनवटे माजी, सुरेश सातव कृष्णा जाधव, सुरेन्द्र डांगे, अनिल गाढवे, प्रवीण आभाळे, पांडुरंग सापिके, स्वप्नील बोठे, महेश सापिके, मंगेश आंबरे, योगेश वाघमारे, रमेश भोसले, डॉ. विजय सोनवणे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक उषा सिनारे, भाऊसाहेब गाढवे, मच्छिंद्र आभाळे, प्रास्ताविक सिनारे, तर आभार  गणेश थोरात, सूत्रसंचालन जितेंद्र शेजाळ, पत्रकार बाळासाहेब सोनवणे, राजुभाऊ पठाण, चंद्रकांत आग्रे, अविनाश डोखे, राहाता प्रेस क्लब अध्यक्ष  रामकृष्ण लोंढे, उपाध्यक्ष दिलीप खरात, आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS