Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धारणगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गावातील सर्व महिला सदस्या अधिकारी, कर्मचारी, सेविका यांचा

Ram Kadam | 12 आमदारांचे निलंबन ही संविधानाची पायमल्ली |LOKNews24
कलाकार प्रमोद पंडित यांचा नरहरी सेनेच्या वतीने सत्कार
माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक हे खर्‍या अर्थाने जलक्रांतीचे जनक ः  पवार

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गावातील सर्व महिला सदस्या अधिकारी, कर्मचारी, सेविका यांचा ज्येष्ठ नेते दगुराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान करण्यात आला. त्यात प्रामुख्याने ग्रामसेविका पुनम अहिरे, सदस्या कविता संतोष चौधरी, माधुरी सूरज रणशुर, कु मोहिनी विठ्ठल मोरे, सोनल सुदर्शन कुहीटे, पुष्पाताई मच्छिंद्र जाधव, कृषी सहाय्यक संगीता पोपटराव खंडागळे, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक संगीता नाईक, अंगणवाडी सेविका शारदा रंभाजी रणशुर, श्रीमती चंद्रकला गोसावी, मदतनीस कल्पना सुखदेव दवंडे, मीना पोपटराव रणशूर, आशा सेविका गंगासागर श्रीकांत कुहिटे, योगिता विलास सुरे, शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम येऊन राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल कु स्नेहल अशोक चौधरी हीचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच सहकार रत्न शंकररावजी कोल्हे तालुका विकास मंडळ अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल  अंबादास कारभारी देवकर, संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल  रामदासजी शिंदे,  नानासाहेब राधुजी थोरात व पद्मभूषण शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्था नूतन उपाध्यक्ष  राऊसाहेब शंकर चौधरी ,माजी सरपंच कोपरगाव तालुका जिनिंग प्रेशिग संस्था नूतन संचालक  नानासाहेब शशिकांत चौधरी, नाटेगावचे सरपंच विकास मोरे यांचाही ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष  रमेश घोडेराव सरपंच वरूणा दिपक चौधरी अमृत संजीवनी संचालक अंबादास लक्ष्मण देवकर, भिकाजी किसन थोरात, आनंदराव वाहाडणे, सोपानराव वहाडने परसराम चौधरी, सोमनाथ वहाडणे, रमाकांत वाकचौरे, संदीप लक्ष्मण चौधरी, दिपक सुरे, बबनराव निकम, दादासाहेब कदम, सुदर्शन कुहिटे, राजेन्द्र सोनवणे, अमित गोडगे, दिलीपराव जाधव, राजेन्द्र जाधव, बाळासाहेब मोरे, सचिन जाधव, सचिन चौधरी, नानासाहेब रेवजी चौधरी, दत्तात्रय पवार, वामन जाधव, संतोष थोरात,यांचेसह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम अध्यक्ष सूचना ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब वाघ यांनी मांडली अनुमोदन सूरज रणशूर यांनी दिले सूत्रसंचालन उपसरपंच गणेश अप्पासाहेब थोरात मनोगत माजी सरपंच दीपक चौधरी यांनी तर आभार संतोष शिवाजी चौधरी यांनी मानले.

COMMENTS