Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलडाण्यात बारावीचा पेपर फुटला

विधिमंडळात उमटले पेपर फुटीचे पडसाद

मुंबई/प्रतिनिधी ः बुलडाण्यामध्ये शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर विधिमंडळात देखील या पेपर फुटीचे

संघर्ष, समन्वय आणि संयम!
तलावात बुडून तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
Prime News Live | आईसह तिन्ही मुलींवर बलात्कार | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः बुलडाण्यामध्ये शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर विधिमंडळात देखील या पेपर फुटीचे तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरत, सरकार काय करतय? झोपलय का? असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र, बोर्डाकडून पेपर फुटीला अधिकृत दुजोरा नाही.
बुलडाण्यात बारावीच्या परीक्षेआधीच गणित विषयाचा पेपर फुटला आहे. सकाळी 10 वाजेपासूनच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा पेपर नेमका कुणी आणि कसा फोडला? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणिताचा पेपर परीक्षेआधीच अनेक विद्यार्थ्यांकडे पोहोचल्याचा संशय आहे. सिंदखेड राजा येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेली नाही. या पेपरफुटीनंतर आता बोर्ड याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, पेपर फुटल्याने जिल्ह्यात मोळी खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे याआधी सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणार्‍या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही पुन्हा एकदा बारावीचा पेपर फुटल्याने परीक्षेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सरकार झोपले काय ? अजित पवारांचा संतप्त सवाल – बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे गणिता पेपर फुटल्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सिंदखेडराजा परिसरात गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता फुटला. तो सगळीकडे प्रसिद्ध झाला. ते रॅकेट आहे की काय? अभ्यास करणार्‍या मुलांचे किती वाटोळे आहे. सरकार काय करतेय मला काही कळत नाही. सरकार झोपलेय की काय?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. मग पुन्हा तुम्ही म्हणता दादा बोलतात, दादा बोलतात. हे बारावीच्या मुलांचे नुकसान आहे. मध्येही एका पेपरचे तसेच झाले, असेही अजित पवार म्हणाले. सभागृहामध्ये शिक्षणमंत्री उपस्थित नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांच्या मुद्द्याला उत्तर दिले. मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने कॉपीमुक्त अभियान सुरु केलेले आहे. तरीही असे प्रकार घडत असतील तर गंभीर बाब आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत या प्रकरणी योग्य ती कारवाई करु, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

COMMENTS