मुंबई/प्रतिनिधी ः सिमेंट आणि वीटेची वाहतूक होणार्या ट्रकमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून अवैध मद्यसाठेची वाहतूक करता
मुंबई/प्रतिनिधी ः सिमेंट आणि वीटेची वाहतूक होणार्या ट्रकमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून अवैध मद्यसाठेची वाहतूक करताना एक कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित ट्रकचालकाकडून मिळालेल्या माहितीनंतर हा मद्यसाठा ज्या गोदामात ठेवला जातो तेथे धाड टाकल्यावर अजून 700 खोके मद्याच्या बाटल्या भरलेले सापडले. या सर्व मद्याची किंमत सूमारे पावणेदोन कोटी रुपये आहे.
गोव्यावरुन सिमेंट वीटाच्या आडून मद्यसाठ्याची वाहतूक सूरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या पथकाला मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरिक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निबंधक योगेश फटांगरे, शहाजी गायकवाड यांच्या पथकाने शनिवारी रात्री गोवा मुंबई महामार्गावर पनवेल तालुक्यातील शिरढोण गावाजवळ सापळा रचला. रात्री उशीरा ट्रक क्रमांक एमएच 04, ईव्हाय 1949 या संशयीत ट्रकला रोखून त्याची तपासणी केल्यावर या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा त्याखाली लपवलेले 1300 खोक्यांमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्या. ही दारु मुंबईत आणून कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारातील एका गोदामात ठेवली जात होती. त्यानंतर या गोदामातून मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ती पुरवठा केली जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी आरोपी ट्रक चालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी मध्यरात्री कळंबोली येथील गोदामात धाड टाकल्यावर तेथेही 700 खोक्यांमध्ये मद्याने भरलेल्या विविध कंपन्यांच्या बाटल्या सापडल्या. आतापर्यंतची राज्य उत्पादन शुल्क विभागाची पनवेलमधील ही सर्वात मोठी कामगिरी आहे. सोमवारी मध्यरात्री कळंबोली लोखंड पोलाद बाजारातील ज्या गोदामात हा मद्यसाठा सापडला आहे. ते गोदाम खिडुकपाडा गावालगत आणि गोदामापासून 400 मीटर अंतरावर जिल्हापरिषदेच्या शाळेची इमारत आहे. कोणत्याही सामान्य नागरिकांना संशय येणार नाही अशा पद्धतीने या गोदामामध्ये हा काळाबाजार सूरु होता. 70 लाख रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा तेथे सापडला. कळंबोली लोखंड बाजारातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे हा बाजार चोरबाजार म्हणून ओळखला जातो.
COMMENTS