Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 40 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल

केंद्रीय वाणिज्य उद्योगमंत्री पीयुष गोयल यांचा विश्‍वास

पुणे/प्रतिनिधी ः येत्या चार ते पाच वर्षांत भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. तसेच ज्या प्रकारे भारताची प्रगती होत आहे, ती बघता आ

विनेश फोगट निलंबित; भारतीय कुस्ती महासंघाची कारवाई
शासकीय वसतिगृहात बाल लैंगिक अत्याचाराबाबत समुपदेशन कार्यक्रम
नगर शहराच्या आमदारांचं नीच राजकारण…. फलक लावत निषेध

पुणे/प्रतिनिधी ः येत्या चार ते पाच वर्षांत भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. तसेच ज्या प्रकारे भारताची प्रगती होत आहे, ती बघता आपली अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 35-40 ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास पोहोचेल आणि प्रत्येक भारतीयाची हीच इच्छा आहे, असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
ते पुण्यात सुरू असलेल्या आशियाई आर्थिक संवादात बोलत होते. उद्योग क्षेत्राला आपल्या कामगिरीबद्दल अभिमान असायला हवा, भारतीय स्थूल अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत मजबूत आहे आणि गेल्या काही वर्षात आपण ज्या सुधारणा केल्या आहेत, त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आम्हाला असा विश्‍वास वाटतो की, भारत आज केवळ जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था नाही, तर पुढची कित्येक दशके, आपली अर्थव्यवस्था हे स्थान कायम ठेवणार आहे. आशिया खंडाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत, इथे अशाही अर्थव्यवस्था आहेत, ज्या लोकशाही शासनव्यवस्थेतील आहेत आणि अशाही आहेत ज्या पारदर्शक किंवा नियमांवर आधारित नाहीत, असे निरीक्षण गोयल यांनी नोंदवले. गेल्या दशकात, भारताने स्वतःचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा तसेच तंत्रज्ञान आणि आधुनिक कार्यपद्धतीशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज भारताला एकविसाव्या शतकातील देश नाही तरी, या ‘दशकाचा देश’ म्हणून नक्कीच जगात ओळख मिळाली आहे. आपण अर्थव्यवस्थाच्या क्रमवारीत, या आधीच दहाव्या स्थानावरून, पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे, असे ते म्हणाले.

COMMENTS