Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवारांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत

हडपसरमधील अनुजा शेवाळे यांची बैलजोडी ठरली विजेती

कर्जत/प्रतिनिधी ः आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याही वर्षीही भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेच्या दुसर्‍या पर्वाच

अहिल्यादेवींचे लोकोपयोगी कार्य हेच त्यांचे खरे स्मरण : प्रा. डॉ. यशपाल भिंगे
श्री वृध्देश्‍वर दूध संघाच्या दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान वर्ग
*दैनिक लोकमंथन ; गुजरातमध्ये मृत्यूंची लपवाछपवी?’*

कर्जत/प्रतिनिधी ः आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याही वर्षीही भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेच्या दुसर्‍या पर्वाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते. या स्पर्धेला माजी केंद्रीय मंत्री, खा. शरद पवार यांच्यासह अनेक आमदार, नेते व दिग्गज उपस्थित होते.

सोमवार रात्रीपासूनच राज्यभराच्या कानाकोपर्‍यातून बैलगाडी शर्यतप्रेमी कर्जत शहरात दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी आ. रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. राज्यभरातील 264 बैलगाडी या स्पर्धेत सहभागी झाले होते. दिवसभर स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अत्यंत अटीतटीची लढत स्पर्धेच्या ठिकाणी पाहायला मिळाली. अशा या रंगतदार शर्यतीत अंतिम स्पर्धेत विजेतेपदावर आपले नाव कोरण्यात हडपसर येथील अनुजा नितीन शेवाळे यांना यश आले. द्वितीय क्रमांक राजू शेठ मासाळ, लोणंद यांनी तर तृतीय पारितोषिक अंश उत्तम गवळी, बदलापूर यांना मिळाले. एकूण 35 गट सकाळपासून संध्याकाळपर्यंत या शर्यतीत पळवण्यात आले. महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेतील विजेत्यांना 2 गटात बक्षिसांचे वितरण करण्यात आले. ज्यामध्ये अंतिम स्पर्धा आणि द्वितीय स्पर्धा अशी विभागणी करण्यात आली होती दोन्ही विभागात प्रत्येकी 7 असे 14 बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली. अंतिम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या बैलगाडी मालकाला 2 लाख 22 हजार 222 रुपये, सन्मानचिन्ह आणि मानाची गदा तर द्वितीय आणि तृतीय आलेल्या विजेत्यांना अनुक्रमे 1 लाख 11 हजार 111 रुपये आणि 77 हजार 777 रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले. तसेच द्वितीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणार्‍या स्पर्धकांना अनुक्रमे 51 हजार 111, 41 हजार 111 आणि 31 हजार 111 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेमुळे शेतकरी आणि बैलाचे नाते घट्ट होईल ः आमदार रोहित पवार
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांत यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर शेतीसाठी काही प्रमाणात कमी झाल्याचेही निदर्शनास येत आहे. पण अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे शेतकरी आणि बैलाचे नाते आणखी घट्ट होईल आणि त्याला एक नवे वळण मिळेल व आपली परंपरा जोपासली जाईल हा महत्त्वाचा हेतू ही स्पर्धा आयोजित करण्यामागे आहे.

COMMENTS