गणेशनगर प्रतिनिधी ः नर्मदा परिक्रमेमुळे आध्यात्मिक ऊर्जा व आत्मिक समाधान मिळते आत्मविश्वास वाढुन निसर्गाशी जवळीक वाढते व वेगवेगळ्या तीर्थांचे दर
गणेशनगर प्रतिनिधी ः नर्मदा परिक्रमेमुळे आध्यात्मिक ऊर्जा व आत्मिक समाधान मिळते आत्मविश्वास वाढुन निसर्गाशी जवळीक वाढते व वेगवेगळ्या तीर्थांचे दर्शन होते नर्मदा परिक्रमा अतिशय खडतर परिक्रमा आहे. ललित धाडीवाल व्यापारी असुनही स्वतचा व्यवसाय बंद करुन परिक्रमा पूर्ण केली. निस्सीम भक्ती नितांत श्रद्धा अत्यंत आनंदाने व भक्तीने नर्मदा परिक्रमेसारखी खडतर साधना ललित धाडीवाल व बापुसाहेब आग्रे यांनी पूर्ण केली असे मनोगत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केले.
ललित धाडीवाल व बापुसाहेब आग्रे यांचे राहाता शहरात जल्लोषात स्वागत करुन सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण कऱणारे ललित धाडीवाल व बापुसाहेब आग्रे यांचा सत्कार करुन स्वागत केले. यावेळी मदनलाल पिपाडा, सुनिल धाडीवाल, नरेंद्र पिपाडा रौनक धाडीवाल तसेच धाडीवाल परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.पिपाडा म्हणाले की 3500 किलो मीटरचा पायी प्रवास करुन परिक्रमा पुर्ण करुन स्वगृही परतले. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ती धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीला अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नर्मदेचे धार्मिक महत्त्वही खूप मोठे आहे. यावेळी प्रवीण बागरेचा, नेमीचंद लोढा, देवेंद्र मुनावत, नरेंद्र मुनावत आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
COMMENTS