Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिजनेस एक्स्पोची व्याप्ती वाढत जाणार – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी :मागील बारा वर्षापासून लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने ‘बिजनेस एक्स्पो’ आयोजित केला जात आहे. मागील दोन वर्ष क

संभाव्य वादळीवारा व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी : तहसीलदार चंद्रे
गोदावरी कालव्याच्या पाण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा : कोल्हे
बनावट सोनेतारणात वापरला… बड्या सराफाचा शिक्का?

कोपरगाव प्रतिनिधी :मागील बारा वर्षापासून लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने ‘बिजनेस एक्स्पो’ आयोजित केला जात आहे. मागील दोन वर्ष कोरानाच्या संकटात जरी ‘बिजनेस एक्स्पो’ होवू शकला नाही, तरी देखील नागरिकांचे ‘बिजनेस एक्स्पो’ बद्दलचे आकर्षण कमी झालेले नाही. यावरून ‘बिजनेस एक्स्पो’ ची लोकप्रियता आजही टिकून असून कोपरगाव बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.  
लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित कोपरगाव बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवास आ. आशुतोष काळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी  लायन्स, लिनेस व लिओ क्लब कोपरगावकरांसाठी करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले.या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत, सेक्रेटरी बाळासाहेब जोरी, खजिनदार अंकुश जोशी, लिनेस क्लबच्या चार्टर्ड मल्टिपल प्रेसिडेंट डॉ. वर्षा झंवर, अध्यक्षा डॉ. अस्मिता लाडे, सेक्रेटरी अंजली थोरे, खजिनदार नेहा बत्रा, लिओ क्लबचे अध्यक्ष सुमित सिनगर, सेक्रेटरी धिरज कराचीवाला, खजिनदार यश बंब, एक्स्पो कमिटी सदस्य राजेश ठोळे, संदीप कोयटे, संदीप रोहमारे, राम थोरे, सुरेश शिंदे, नरेंद्र कुर्लेकर, राहुल नाईक, सत्येन मुंदडा, सुधीर डागा, बाबा खुबाणी, सुमीत भट्टड, किरण शिरोडे, माजी जि. प. सदस्य राजेश परजणे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, जिनिंग व प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, माजी नगराध्यक्षा सौ. ऐश्‍वर्या सातभाई, माजी नगरसेवक मंदार पहाडे, कृष्णा आढाव, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, बाळासाहेब संधान, राजेंद्र खैरनार, डॉ. आतिष काळे, शैलेश साबळे, सचिन गवारे, विजय दाभाडे, राकेश शहा, आशुतोष देशमुख, ऋतुराज काळे आदींसह लायन्स, लिनेस व लिओ क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS