पाथर्डी प्रतिनिधी - तालुक्यातील कोरडगाव येथे महाराष्ट्र विज वितरण कंपनीला अनेक वर्षापासून मागणी करूनही गावाला सिंगल फेजने विद्युत पुरवठा होत नस
पाथर्डी प्रतिनिधी – तालुक्यातील कोरडगाव येथे महाराष्ट्र विज वितरण कंपनीला अनेक वर्षापासून मागणी करूनही गावाला सिंगल फेजने विद्युत पुरवठा होत नसल्याने तसेच कालबाह्य व जुनी झालेली पथदिवे,वीज वाहक तारा,पुरवठा यंत्रणा नवीन बसवण्यात याव्यात यासाठी कोरडगाव ग्रामपंचायत आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरणचे सुनिल आहेर यांना निवेदन देण्यात आले.दरम्यान मागण्या आठ दिवसांच्या आत मान्य न झाल्यास कोरडगाव येथे तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष भोरु उर्फ रवींद्र म्हस्के,ग्रा.पं.सदस्य लहानु वाळके,जालिंदर मुखेकर,सुखदेव तुपेरे,सर्जेराव सानप, अण्णासाहेब कुसळकर,बबन गावडे,बबनराव मुखेकर,बाबुराव देशमुख,एकनाथ ढोले,करण पवार,प्रकाश बर्डे,संतोष जाधव यांच्यासह मुखेकरवाडी व कोरडगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना म्हस्के यांनी म्हटले की,कोरडगाव येथील सार्वजनिक वीज वितरण व्यवस्था ही कालबाह्य झाली असून सुमारे पन्नास वर्षा अगोदर उभारलेले विजेचे खांब,पथदिवे अनेक ठिकाणी पडले आणि वाकले आहेत.तसेच लोंबकळत असलेल्या विद्युत वाहकतारा यामुळे गावातील नागरिकांना इजा पोहचू शकते.अनेक दिवसापासून गावकरी सिंगल फेज विद्युत पुरवठ्याची मागणी करत असून अद्याप पर्यत त्यावर कुठलेही ठोस पावले उचली गेली नाहीत.या भागातील लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे ताबडतोब सिंगल फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा.
COMMENTS