Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात थंडी ओसरायला सुरूवात

बहुतांश ठिकाणी पारा 12 अंशांवर उत्तर महाराष्ट्रात मात्र काही प्रमाणात गारठा

मुंबई/प्रतिनिधी ः देशासह राज्यामध्ये वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होऊ लागली आ

कोरोना विरुद्ध युद्ध सुरूच, शस्त्र खाली ठेऊ नका : पंतप्रधान मोदी
अहमदनगरमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीची पुन्हा दिसून आली एकी….
 लव्ह जिहादच्या विरोधात सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा

मुंबई/प्रतिनिधी ः देशासह राज्यामध्ये वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे. राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. गारठा कमी झाला आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारादेखील 35 अंशांच्या वर गेला आहे.
 विशेष म्हणजे राज्यात कमाल आणि किमान तापमानात तफावत वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात आणखी दोन दिवस थंडी कायम राहील. त्यानंतर तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात किमान तापमानात वाढ होत असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. नाशिकमधील निफाड येथे राज्यातील निचांकी 8.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कालपर्यंत औरंगाबाद, धुळे, जळगाव या जिल्ह्यांत पारा 10 अंशांच्या खाली होता. मात्र, बुधवारी जळगाव येथे पारा 10 अंशांच्यावर गेला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही बहुतांश ठिकाणी किमान तापमान 12 अंशांच्यावर गेले आहे. गेले काही दिवस राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मात्र, आता आकाश निरभ्र झाल्याने राज्यात दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. पहाटे व रात्री कडाक्याची थंडी व दुपारी ऊन अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे गारठा तर दुपारी चटका अशी स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कमाल आणि किमान तापमानात 13 ते 24 अंशांपर्यंत तफावत नोंदवली जात आहे. विदर्भातील कमाल तापमान 35 अंशांवर पोहोचले आहे. ब्रह्मपूरू येथे राज्यातील उच्चांकी 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने माहिती दिली आहे की, राजस्थान आणि परिसरावरील चक्राकार वारे निवळले आहेत. हिमालयाच्या पश्‍चिम भागात आजपासून नव्याने पश्‍चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांत थंडी ओसरली आहे. आज उत्तर पश्‍चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यात तुरळक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

COMMENTS