Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पुढाकारातून श्री विवेकानंद विद्यामंदिर येथे चित्रकला स्पर्धा संपन्न

पाथर्डी प्रतिनिधी - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा या उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी

शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आंदोलन
महात्मा फुले, आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या
लम्पी आजाराबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती होणे गरजेचे- डॉ. तुंबारे

पाथर्डी प्रतिनिधी – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा या उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धा पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी येथे  उत्साहात पार पडली.

        अहमदनगर जिल्हा दक्षिण लोकसभेचे खासदार डॉ.सुजय  विखे यांच्या पुढाकारातून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यावेळी ३४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नोंदणी करून ऑफलाइन फॉर्म भरविण्यात आले. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे: प्रथम क्रमांक- वैष्णवी भास्कर नेहुल  रोख तीन हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक- गार्गी संदीप महामुनी रोख दोन हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक धनश्री पोपट पारखे रोख एक हजार रुपये व प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ क्रमांक- प्रतीक भानुदास फुंदे,आदिती जालिंदर लोणके रोख पाचशे रुपये व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

     पारितोषिक कार्यक्रम प्रसंगी नगरपरिषदेचे मा. नगरसेवक प्रसाद आव्हाड, प्रशांत शेळके, विलास रोडी, स्वीय सहाय्यक अंजाबापू गोल्हार, अमोल गर्जे, अजय रक्ताटे, एडवोकेट प्रतीक खेडकर,सचिन वायकर, एजाज शेख, अमोल सोनटक्के, आप्पा बोरुडे, विवेक देशमुख, अभय सबलस, संपत घारे, दादासाहेब वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या सहकार्यातून सदर स्पर्धा संपन्न झाली.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजाबापू गोल्हार यांनी केले , सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायके यांनी तर आभार संजय ससाने यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक दीपक राठोड आत्माराम दहिफळे,संजय गटागट, आयुब सय्यद, अमोल आमले यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS