Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निधी वाटपावरून नाराजीनाट्य

भाजप आमदार दादाराव केचे यांचा राजीनाम्याचा इशारा

वर्धा/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव सुमित वानखेडे यांनी आर्वी मतदारसंघात विकास कामांसाठी लक्षणीय निधी आणला. त्यावर तीव्र आ

भारतात 24 तासात 3,14,835 नवे कोरोना रुग्ण
लोकसभा निवडणुकीसाठी भरारी पथके तयार
शेअर मार्केट मधील ब्रोकरने घातला 15 लाखांचा गंडा

वर्धा/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव सुमित वानखेडे यांनी आर्वी मतदारसंघात विकास कामांसाठी लक्षणीय निधी आणला. त्यावर तीव्र आक्षेप घेत भाजपा आमदार केचे यांनी फडणवीस यांना पत्र लिहून एक प्रकारे जाबच विचारला आहे.
या पत्रात केचे यांनी म्हटले आहे की, की कारंजासाठी दिलेला निधी आष्टीत व आर्वीत वळता करा. मागणी नसताना हा निधी कसा मंजूर झाला? फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या निधी मंजूर करण्याच्या अधिकारावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत तीन दिवसांत मंजूर केलेला निधी तात्काळ रद्द करावा व तो आर्वीला द्यावा, असा निर्णय न घेतल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा गडकरी समर्थक म्हटल्या जाणार्‍या केचे यांनी दिला आहे.आर्वी विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारकडून निधी देण्यात आला आहे. पण या निधीसाठी स्थानिक भाजप आमदार दादाराव केचे यांनी कोणतेही पत्र दिले नव्हते. दुसर्‍यांच्याच पत्रावर हा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. आमदार दादाराव केचे म्हणाले की, आपले पत्र नसताना दुसर्‍याच्या पत्रावर निधी देणे हा आपला घोर अपमान आहे, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असेच जर होत असेल तर नाईलाजास्तव मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा दादाराव केचे यांनी दिला आहे. मी दुसर्‍यांदा आर्वीचा आमदार आहे, माझ्या पत्राशिवाय विकास निधी देऊ नये असे माझे मत आहे. तरीही माझे पत्र नसताना निधी दिला. पत्र न देता निधी दिला ही शोकांतिका आहे. हा माझा अपमान आहे, त्यामुळेच असे असेल तर मला राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार म्हणून ओळख असलेले सुधीर दिवे यांना देखील मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. दिवे यांनी अनेक उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत दावेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

COMMENTS