Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरेगाव शिवारात नऊ एकर ऊस जळून खाक

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत शेतातुन गेलेल्या विजवितरण तारांच्या घर्षणाने ऊसाच्या शेताला आग लागुन  शेतकरी प

विवेक कोल्हे यांच्याकडे स्व.कोल्हे साहेबांसारखे व्हिजन ः काका कोयटे
शासनाचा नाकर्तेपणा, आठ महिन्यांपासून उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
दीक्षा सोनवणेची अजिंक्य पद कुस्ती स्पर्धेसाठी निवड

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत शेतातुन गेलेल्या विजवितरण तारांच्या घर्षणाने ऊसाच्या शेताला आग लागुन  शेतकरी प्रशांत शिवाजीराव वाबळे  यांच्या ऊसाच्या क्षेत्रासह इतर शेतकर्‍यांचा नऊ एकरावरील ऊस जळून खाक झाला नागरिकांच्या प्रयत्नाने राहते घर वस्ती व इतर दहा एकर ऊस वाचला.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शेतकरी प्रशांत वाबळे यांच्या माहितीवरुन नोंद केली आहे. मंगळवार सकाळी 11.30 वाजता महावितरण कंपनीच्या सुरेगाव शिवारातुन शेताततुन गेलेल्या विद्युत तारांचे घर्षण झाले त्याच्या पडलेल्या ज्वालांनी ऊसाने पेट घेतला आगीने उग्ररुप धारण केले यात गट नंबर 396/1 मधील शेतकरी प्रशांत शिवाजीरव वाबळे यांचा चार एकर त्याशेजारी असलेल्या संजय सुंदरराव कदम यांचा ठीबकसह तीन एकर ऊस व योगेश प्रतापराव कदम, नारायण वाबळे यांचाही ऊस जळुन खाक झाला सर्व शेतकर्‍यांचा मिळुन नऊ एकरावर ऊस जळाला दुर्दवाने काही अंतरावर असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आग्निशामक गाडी पासिंगसाठी श्रीरामपूरला गेली होती. प्रसंगावधान दाखवत परिसरातील शेतकरी ग्रामस्थांच्या प्रयत्नाने राहते घर वस्ती व शेजारीच असलेला दहा एकर ऊस वाचल्याची माहिती प्रशांत वाबळे यांनी दिली.

सदर अग्नि तांडवामुळे बहुतांशी भागात खोडक्या झाल्याने सांगून किमान एकरी पन्नास ते साठ टन असे एकूण 5.40 लाखांचे नुकसान झाले असून साधारण एक तासाने संजीवनी सहकारी कारखान्याचा अग्नीशामक बंब आला मात्र तोवर आगीने आपला प्रताप संपवला होता.घटनेनंतर कर्मवीर काळे साखर कारखान्याच्या शेतकी विभागाचे अधिकारी, महसूल अधिकारी, महावितरण कंपनीचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे
प्रशांत वाबळे, शेतकरी, सुरेगाव

COMMENTS