Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात 

सातारा प्रतिनिधी- भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील मलटण गावच्या हद्दीतील तब्बल ५० फ

मान्सून आज केरळमध्ये होणार दाखल
आई अन् पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने फरफटत नेलं | LOK News 24
अखेर पुणे मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला गती

सातारा प्रतिनिधी– भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील मलटण गावच्या हद्दीतील तब्बल ५० फुट खोल दरीत गाडी कोसळल्याने हा अपघात झाला आहे.  गाडीत आमदार गोरे यांच्या सह चौघेजण प्रवास करत होते या अपघातात चौघांना गंभीर दुखापत झाली असून तात्काळ पोलीस मदत मिळाल्याने आ.जयकुमार गोरे यांच्या सह त्यांचे अंग रक्षक, स्वीय सहाय्यक आणि चालक या चौघांना ही उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास सातारा पोलीस करत असून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. आ.जयकुमार गोरे हे फलटण हुन माणच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS