Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधक आक्रमक  

नागपूर प्रतिनिधी - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात फोन टॅपिंग प्रकरणाचे चांगलेच पडसाद उमटले. या मुद्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला. काँग्रेसचे प

सोशल मीडियावरील तक्रारीसाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करावी
न्याय हक्कासाठी परिवर्तन करा : निशिकांत पाटील
तैवान कडून भारताला दिवाळीची मोठ गिफ्ट

नागपूर प्रतिनिधी – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात फोन टॅपिंग प्रकरणाचे चांगलेच पडसाद उमटले. या मुद्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिक प्रकरणावरून मुद्दा उपस्थित करत विधानसभेत यावर चर्चा करण्यासाठी बोलू देण्याची मागणी केली होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी त्यांना परवानगी दिली नाही. यामुळे विरोधकांनी आक्रमक होत, सभागृहात गदारोळ घातला. विरोधी पक्षनेते अजित पवार देखील अध्यक्षांच्या या भूमीकेवर चांगलेच संतापले. आपल्या अधिकारांचा वापर करून, आपलीच बाजू योग्य कशी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न आपण करत आहात. या सरकारला पाठिशी घालण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, अशा शब्दांत अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली, यानंतर विरोधीपक्षांनी सभागृहातून बाहेर पडत सभात्याग गेला.


नागपूर हिवाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरले आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मोठा गदारोळ सभागृहात पाहायला मिळाला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरले. विधानसभेच्या आवारात यानंतर श्रीखंड आणत आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या पोलिस महासंचालक रश्मी शूक्ला यांना क्लीनचिट दिली होती. मात्र, न्यायालयाने बुधवारी हा अहवाल फेटाळल्याने शिंदे फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे. या मुद्यावरून आज सभागृहात नाना पटोले यांनी चर्चा व्हावी अशी मागणी करत सभागृह अध्यक्षांना बोलू देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना परवानगी नकरल्याने विरोधी पक्ष नेत्यांनी सभात्याग केला

COMMENTS