कोतुळमध्ये पोलिस बंदोबस्तात अखेर रस्ता खुला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळमध्ये पोलिस बंदोबस्तात अखेर रस्ता खुला

दोन शेतकर्‍यांच्या वादात जावयाच्या गाडीवर दगडफेक

अकोले प्रतिनिधी ः दोन शेतकर्‍यांच्या रस्त्याच्या वादावरून सासरवाडीला आलेल्या जावयाच्या गाडीवर दगडफेक करून जावयाच्या  चार चाकी गाडीच्या काचा फोडल्याची

अमरधाममधील कामगारांना मनपाच्या सेवेत नोकरी द्या
अहमदनगर मनपा पोटनिवडणुक : भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय
कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकऱ्याने संपवीली जीवनयात्रा

अकोले प्रतिनिधी ः दोन शेतकर्‍यांच्या रस्त्याच्या वादावरून सासरवाडीला आलेल्या जावयाच्या गाडीवर दगडफेक करून जावयाच्या  चार चाकी गाडीच्या काचा फोडल्याची घटना नुकतीच घडली. यामुळे सासरवाडीला येणे जावयाला चांगलेच महागात पडले. गाडीची नुकसान केले म्हणून जावायाने या शेतकर्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे ही घटना सोमवारी रात्री साडे आठच्या दरम्यान घडली.


याबाबत अधिक माहिती अशी की, कोतुळ येथील रहिवासी सुरेश वामनराव देशमुख आणि लक्ष्मण नामदेव देशमुख यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. अनेक दिवसापासून याबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. याबाबत काही न्यायालयाचे निकाल झाले आहे.  मंगळवार 22 डिसेंबर रोजी सदर रस्ता खुला करून देण्यासाठी प्रशासन समक्ष येऊन रस्ता खुला करून देणार होते. त्याचे नोटीस आदल्या दिवशी संबंधित शेतकर्‍यांना देण्यात आली होती. या रागातून हा प्रकार झाल्याचा अंदाज आहे. आदल्या दिवशी सुरेश देशमुख यांचे लेक- जावई सासरवाडीला आले होते. आरोटे हे या रस्त्याचे कडेला गाडी लावून देशमुख यांच्या घराकडे जात असताना त्यांच्या त्यांच्या एमएच 13 डीएम 6008 या ह्युंदाई व्हेन यू या चार चाकी गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. याबाबत जावई अमोल सुधाकर आरोटे राहणार संगमनेर यांनी अकोले पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, 12 डिसेंबर रोजी संगमनेर येथून दुपारी दोन वाजता  पत्नी व लहान मुलगी समवेत शिळवंडी येथे शेतीच्या कामासाठी गेलो होतो. तेथून शेतीचे काम आटोपून सासरवाडीला आलो, असता माझी गाडी संतोष विश्‍वनाथ गीते यांचे पडीक जागेत गाडी लावली. व मी सासरे सुरेश वामनराव देशमुख यांचे घरी जात असतांना, लक्ष्मण नामदेव गोडे भरत नामदेव गोडे, इंदिरा लक्ष्मण गोडे, जितेंद्र लक्ष्मण गोडे, इतर अनोळखी दोन लोकांनी माझ्या गाडीच्या काचा फोडून व बंपर तोडून गाडीचे नुकसान केले. व जितेंद्र लक्ष्मण गोडे लक्ष्मण नामदेव गोडे त्यांनी लाथा बुक्याने मारहाण करीत शिवीगाळ करत व भरत नामदेव गोडे लक्ष्मण गोडे सरला भरत गोडे यांनी गाडीचे काचा फोडून नुकसान केले. मला व सासरे यांना शिवीगाळ व रस्ता अडवून दमदाटी केली. तुम्ही कसा रस्ता काढून घेता, असे बोलून दमदाटी केली अशी फिर्याद अकोले पोलिसात नोंदवली आहे. दरम्यान मंगळवारी  न्यायालयीन आदेशाप्रमाणे महसूल प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हा वादग्रस्त रस्ता खुला केला. यावेळी नायब तहसीलदार मंडलाधिकारी  पोलीस अधिकारी पोलीस पाटील सरपंच भूमी अभिलेख भूमापन चे अधिकारी उपस्थिती होते.

COMMENTS