Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओझर खेड येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न 

त्र्यंबकेश्वर - ओझरखेड येथे वारकरी संप्रदायाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत धर्म संसद नुकतीच संपन्न झाली. तत्पूर्वी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सा

आगडगावमध्ये नवरात्र उत्सव निमित्ताने महिला अखंड हरिनाम सप्ताह 
श्री क्षेत्र पंचाळेत सदगुरू गंगागिरी महाराजांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह
कन्हैया दूध उद्योग समूहाकडून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

त्र्यंबकेश्वर – ओझरखेड येथे वारकरी संप्रदायाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत धर्म संसद नुकतीच संपन्न झाली. तत्पूर्वी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. त्रंबकेश्वर तालुक्याचे शेवटचे टोक गुजराथ राज्याच्या सरहद्दीवर म्हणून ओझरखेडची ओळख आहे निसर्ग संपन्न म्हणूनही दुर्गम मागास भाग ओळख असे ओझरखेड आहे. प्रसिद्ध महामंडलेश्वर रघुनाथदासजी महाराज उर्फ आयुर्वेदाचार्य फरशीवाले बाबा यांच्या पुढाकाराने व हरी ओम विश्वेश्वर सेवा मंडळ यांच्यावतीने धर्म संसद झाली. भागवत संप्रदायातील वारकरी संप्रदायातील मान्यवर वारकरी कीर्तनकार प्रवचनकार यांची उपस्थिती होती. व्यसनमुक्तीचा संदेश यातून देण्यात आला. साधू महंत संत यांचे दर्शन ग्रामीण भागातील जनतेला झाले.

महंत काशिनाथ दासजी महाराज खोरीपाडेकर,  महंत रामनगिरी महाराज, श्री श्री 1008 महंत महामंडलेश्वर देवबाप्पा, हरिश्चंद्र महाराज कुवरा, माधवदासजी राठी महाराज हभप सिताराम बाबा होमपाडेकर, भरत महाराज दरवडे यांनी चार दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहात मार्गदर्शन केले. श्रीकृष्णाचा बोध कलियुगात अंगीकारल्यास कृष्ण योगातून अध्यात्मिक उन्नती केल्यास भौतिक अडचणी वर  मात करता येईल असे देवबाप्पा, माऊली धाम यांनी मुख्य कार्यक्रमात सांगितले संदेश दिला. संत महंत महानुभाव भजन कीर्तन गायक मंडळी मृदंगाचार्य पेटी मास्टर चोपदार सेवेकरी व दानशूर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ओझरखेड मागास भाग आहे या ठिकाणी कित्येक वेळा मोबाईलला रेंज ही नसते वाहतूक साधने मोठे उपलब्ध नाहीत अशा परिस्थितीत तेथील जनतेला आध्यात्मिक बळ या निमित्ताने मिळाले.विविध क्षेत्रातील मान्यवर सांगता समारंभास उपस्थित होते ग्रामस्थांची चर्चा केली असता राज्य शासन आणि केंद्रशासन ओझरखेड हे शेवटचे टोक असल्याने लक्ष देत नाही प्रगती आणि विकास येथे  नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.

COMMENTS