पाथर्डी/प्रतिनिधी - महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी व विद्यार्थ्यांकडील अभिनव कल्पना आविष्कारित व्
पाथर्डी/प्रतिनिधी – महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी व विद्यार्थ्यांकडील अभिनव कल्पना आविष्कारित व्हाव्यात या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरवर्षी आविष्कार स्पर्धेचे आयोजन करते. ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल. व पीएच. डी. या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी नैसर्गिक शास्त्रे, वैद्यकीय व औषध निर्माणशास्त्र, कृषी व पशुपालन, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि मानव्यविद्या या सहा विद्याशाखांत घेतली जाते. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालय, जिल्हा व विद्यापीठ स्तरावर केले जाते.
या स्पर्धेसाठी महाविद्यालयातून चार संशोधन प्रकल्प जिल्हास्तरावरील सादरीकरणासाठी पाठविण्यात आले होते. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, विळदघाट अहमदनगर येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. अहमदनगर जिल्ह्यातून नैसर्गिक शास्त्रे या विभागातून पदवी स्तरावरील केवळ तीन विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प विद्यापीठ स्तरासाठी निवडण्यात आले त्यात बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचा एक संशोधन प्रकल्प आहे. मानसिक आरोग्यावर (कल्याण) समाज माध्यमांचा प्रभाव या विषयावर कु. अंकिता जोजारे आणि कु. रूपाली दिनकर यांनी हा संशोधन प्रकल्प सादर केला. या यशासाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी अंकिता जोजरे, रूपाली दिनकर व मार्गदर्शक आणि समन्वयक प्रा.डॉ. अभिमन्यू ढोरमारे यांचे अभिनंदन केले व त्यांना विद्यापीठ स्तरावरील सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS