Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत संताजी महाराजांची जयंती उत्साहात

राहुरी प्रतिनिधी - राहुरीत संताजी महाराजांची जयंती उत्साहात पार पडली. राहुरीचे तहसीलदार शेख, राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी संताजी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसचा दबदबा
कोपरगावकरांचा धारणगाव रस्त्याचा त्रास होणार कमी रस्त्याचे लवकरच काम सुरु होणार -आ. आशुतोष काळे
बँकांतील संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे

राहुरी प्रतिनिधी – राहुरीत संताजी महाराजांची जयंती उत्साहात पार पडली. राहुरीचे तहसीलदार शेख, राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी संताजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी महसुल विभागाच्या नायब तहसीलदार पुनमजी दंङिले , नायब तहसीलर संध्याताई दळवी, नायब तहसीलदार सचिनजी औंटी तेली, विकास साळवे, सयाजी शेंडगे आणि तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी आणि समाज्याच्या नगरसेविका मुक्ताताई करपे उपस्थित होत्या. तहसीलदार शेख यांनी संताजी महाराजांचे कार्य अलौकिक असे उद्गार काढले .


राहुरी नगरपरिषदेच्या वतीने संताजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी तेली समाज्याच्या नगरसेविका श्रीमती.मुक्ताताई करपे यांच्या हस्ते संताजी महाराज प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पालीका प्रशासनाच्या वतीने सुनिलभाऊ कुमावत,विकास घटकांबळे, महेद्र तपकिरे, स्वप्नील काकडे, आप्पासाहेब तनपुरे, सुधीर वैद्य, बाबासाहेब गुंजाळ, राहिंज आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.तसेच राहुरी पंचायत समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली त्या प्रसंगी सभापती सुरेशराव निमसे, गट विकास अधिकार बाळासाहेब ढवळे, गणेश लहानगे, सुनील सरोदे, लक्ष्मण आगलावे, रविद्र मांडे आणि सर्व अधिकार आणि कर्मचारी उपस्थित होते. राहुरीत सर्व शासकीय निम शासकीय कार्यालयात संताजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उभ्या महाराष्ट्राची आई तुळजा भवानी पालखी मंदिरात तेली समाज्या वतीने संताजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व समाज बांधवांनी संताजी महाराजांचा जयघोष केला. यावेळी समाज भुषण ह.भ.प.नामदेव महाराज शेजुळ,जेस्ठ समाज सेवक सितारामशेठ लोखंडे, सुरेशदादा धोत्रे, तेली समाज तालुकाध्यक्ष, दत्तात्रय सोनवणे ,शहराध्यक्ष संजय पन्हाळे, किशोरशेठ इंगळे, रावसाहेब शेजुळ, शरदराव इंगळे, कैलासदादा शेजुळ विजय करपे, आण्णासाहेब इंगळे, योगेश लोखंडे, सुनील शेलार, जयश्रीताई शेलार आणि संदीप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. संताजी महाराजांची माहिती समाज भुषण हभप नामदेव महाराज शेजुळ यांनी दिली तर समाजाच्या वतीने आभार दत्तात्रय सोनवणे आणि संजय पन्हाळे यांनी मानले.

COMMENTS