Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील

मुंबई / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि., राजारामनगर (साखराळे) चे अध्यक्ष, राज्याच्या सहकारी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते पी.

ढाकणी येथील कुस्ती मैदानात पै. गणेश कुंकुले याने पटकावली चांदीची गदा
वडोलीत शेतात वीज पडून बैल ठार
औंधच्या 16 गावच्या सिंचन योजनेला निधी उपलब्ध करणार : ना. अजित पवार

मुंबई / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि., राजारामनगर (साखराळे) चे अध्यक्ष, राज्याच्या सहकारी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते पी. आर. पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबईच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदी लोकनेते सुंदरराव सोळंकी सहकारी साखर कारखाना, माजलगावचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रकाशराव सुंदरराव सोळंकी व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप पुंजाजी ओहोळ या दोघांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निवडी करण्यात आल्या.
माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नॅशनल फेडरेशन, दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भगतदादा पाटील, सौ. शैलजादेवी जयंतराव पाटील, आ. मानसिंगराव नाईक, आ. मोहनराव कदम यांच्यासह असंख्य मान्यवर व कार्यकर्त्यांनी पी. आर दादा व उपाध्यक्षांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
मुंबई येथे निवडणूक निर्णय अधिकारी, मुंबई नगरीचे उपनिबंधक पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत स्व.विलासराव देशमुख सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब मोहनराव पाटील यांनी अध्यक्ष पदासाठी पी. आर. दादांचे नांव सुचविले. त्यास नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगरचे अध्यक्ष, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनुमोदन दिले. बैठकीस माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आ. नरेंद्र घुले-पाटील, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना माढाचे अध्यक्ष आ. बबनराव शिंदे, संत कूर्मदास सहकारी साखर कारखाना, सोलापूरचे अध्यक्ष धनाजी साठे, छ. शाहू सहकारी साखर कारखाना, कागलच्या अध्यक्षा सुवासिनी विक्रमसिंह घाडगे, अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा रश्मीताई बागल यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

COMMENTS