Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबै बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकरांना क्लीन चिट

मुंबई : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँकेतील घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे श

कार्तिकी यात्रे निमित्त साेमवारपासून पंढरपूरसाठी रेल्वेच्या ३५ फेऱ्या
कोर्टात विरोधात निकाल गेल्याच्या कारणावरून एकास मारहाण
पावसाने उघडीप दिल्याने दिवाळीनिमित्त पालकमंत्र्यांचे शेतकर्‍यांच्या बांधावर दौरे

मुंबई : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँकेतील घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या 2015 मधील आर्थिक अनियमितता प्रकरणात कोणतेही पुरावा सापडले नाहीत, असे सांगत आर्थिक गुन्हे शाखेने दरेकर यांना दिलासा दिला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात दहा मजूर संस्थांना आरोपी केले आहे. परंतु दरेकर आणि इतर सहभागींबाबत कुठलेही पुरावे सापडले नसल्याचा उल्लेख करत त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष, संचालक आणि पदाधिकार्‍यांनी पदाचा दुरुपयोग करून आणि बनावट कागदपत्रांद्वारे 123 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप दरेकरांवर करण्यात आला होता. या प्रकरणी दरेकरांवर आरोप केल्यानंतर सुनावणी सुरू होती. बँकेने नाबार्डची परवानगी न घेता एमपीएसआयडीसी मध्ये अवैधरित्या 110 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. रिकव्हरी साईटची स्थापना करण्यासाठी बेकायदा निविदा देऊन बँकेचे सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान केले. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 27 मार्च 2015 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

COMMENTS