‘हा प्रोपगंडा आणि वल्गर सिनेमा…’

Homeताज्या बातम्या

‘हा प्रोपगंडा आणि वल्गर सिनेमा…’

गोव्यात 53 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सुरू होता अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये इफ्फी पुरस्काराचं वितरण होतं. मात्र यंदाचा इफ्फी महोत्सव वादाच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी केले स्वागत
पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा;अपघात टाळा!
हिंदू हा विश्वातील सर्वात प्राचीन धर्म : ह.भ.प. राऊत

गोव्यात 53 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सुरू होता अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये इफ्फी पुरस्काराचं वितरण होतं. मात्र यंदाचा इफ्फी महोत्सव वादाच्या भोवऱ्यात आला आहे. या वादाचं कारण आहे तो म्हणजे विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाइल्स हा सिनेमा. महोत्सवात अनेक दिग्गज आपलं मनोगत मांडत होते आपल्या भावना व्यक्त करत होते. अशातच ज्यूरी हेड आणि इस्रायली सिनेमांचे निर्माते नादव लॅपिड यांनी मनोगत व्यक्त करताना काश्मीर फाइल्स सिनेमावर चांगलाच निशाणा साधला.  हा सिनेमा एका विशिष्ट प्रोपगंडा असलेला आणि वल्गर आहे.  इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात काश्मीर फाईल्स सारख्या सिनेमाला स्थान मिळालं हे अयोग्य आहे’ . निर्माते नादव लॅपिड यांचा महोत्सवातील मनोगताना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

COMMENTS