Homeताज्या बातम्यासंपादकीय

जर्मनीत फॅसिस्ट बोकाळले !

जर्मनीच्या कॅमिटज् शहरात नुकत्याच झालेल्या एक आंदोलनाने आख्या जगाला हादरा बसला आहे!  जवळपास सहा हजार लोकांनी रस्त्यावर उतरून जय हिटलर असा नारा दि

मतदान आणि आयोग !
सरकारच्या समितीला सर्वोच्च न्यायालयात नकार ! 
तिसर्‍या पर्यायाच्या शोधात !

जर्मनीच्या कॅमिटज् शहरात नुकत्याच झालेल्या एक आंदोलनाने आख्या जगाला हादरा बसला आहे!  जवळपास सहा हजार लोकांनी रस्त्यावर उतरून जय हिटलर असा नारा दिला. या रस्त्यावर उतरलेल्या या लोकांना फॅसिस्ट संबोधून चान्सलर मर्केल यांनी त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. यापूर्वी जर्मनीच्या गुप्तचर विभागाने कॅमिटज् विभागात फॅसिस्ट लोकांचे अस्तित्व असून त्यांची संख्या जवळपास सत्तावीस हजार एवढी दाखवली गेली आहे. परंतु, जगातून फॅसिस्ट आणि फॅसिझम या दोघांचे उच्चाटन दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर करण्यात आले. त्यामुळे, अशी काही संख्या असेल यावर कोणाचा विश्वास बसणे शक्य नाही. काल, जर्मनीत मात्र, या अस्तित्वाची प्रचिती तेथील पोलिसांना आली. पोलिसांच्या रस्त्यावर अशा प्रकारे फॅसिस्ट विचारांचे लोकं उतरतील याची आम्ही कल्पना देखील केली नव्हती. अर्थात, जगात सर्वात एक्स्ट्रीम विचारांचे पेव फुटले आहे. समाजवादी, साम्यवादी, लोकशाही अशा राजकीय विचारसरणी सत्तास्थानी असताना जगावर लादण्यात आलेल्या जागतिकीकरणाचे दुष्परिणाम आता उमटू लागले आहेत. जागतिकीकरण लादणाऱ्या अमेरिकेने सुरूवातीच्या काळात जग ग्लोबल होवून तरूणांसाठी सर्वत्र रोजगार खुला होईल, अशी फुशारकी मारली होती. परंतु, प्रत्यक्षात जागतिकीकरण सुरू झाल्यावर अमेरिकेनेच थेट संकुचित भूमिका घेतली. अमेरिकेत बेरोजगारी चा प्रश्न निर्माण झाल्याने अमेरिकेने जगातील इतर देशांच्या तरूणांना रोजगार बंदी आणली होती. यातून जगभरातील अमेरिकेत स्थायिक झालेल्या युवकांना बेरोजगार होवून आपल्या देशात परतावे लागले होते. अर्थात, प्रत्येक देशात जागतिकीकरणाच्या नावाखाली खाजगीकरणाला ऊत आला. खाजगीकरण झाले की, नफा हे उद्दिष्ट प्रधान होते. सार्वजनिक उपक्रमात खाजगी भांडवलदार शिरले की, नफा हाच प्रधान ठरतो. त्यातून नोकरकपात आणि बेरोजगारी हे पाचवीलाच असते. मात्र, या समस्या निर्माण करणारे भांडवलदार हेच या बेरोजगार तरूणांची माथी भडकवतात. जेणेकरून कोणत्याही देशात राजकीय कारभार अनांगोंदीचा ठरला की, त्यांचे फावते. जर्मनीच्या या रस्त्यावर उतरलेल्या लोकांमध्ये अशा तरूणांचा भरणा अधिक होता. आधुनिक काळात समाज माध्यमांत रमणारे हे तरुण जगाच्या वास्तव इतिहासापासून कोसो दूर असतात. त्यांना इतिहास माहीत नसल्याने त्याचे दुष्परिणामही ठाऊक राहत नाही. परिणामी, मानव समाजातून हद्दपार झालेल्या विचारांचे पुनरूज्जीवन असे बेमालूम होते, त्याचा पत्ताही लागत नाही. जर्मनीच्या कॅमिटज् शहरात घडलेला प्रकार हा जगाने गंभीर दखल घ्यावा इतका भयावह आहे. नवभांडवलदार प्रवृत्ती जगभर जो उच्छाद मांडत आहेत, त्याची ही परिणती आहे. जगातील अनेक देशात एक्स्ट्रीमिस्ट असणारे सत्ताधारी उदयाला आले. जगाला लोकशाहीची संकल्पना देणारे स्वातंत्र्य, समता, बंधुताची नांदी ज्या फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळाली, त्या फ्रान्समध्ये देखील अलीकडेच उजवा विचार वाढीस लागतो आहे. उजवा विचार हा अनुषंगिक फॅसीझम ला घेऊन येतो. त्यामुळे, अशा प्रकारचे धोके नव राजकीय सत्तांच्या उभारणीतूनही येऊ घातले आहेत. त्यामुळे जगाने या सर्व संदर्भात सावध होत असताना यावर उपाययोजनाही करण्याची गरज आहे. जर्मनीच्या कॅमिटाछ शहरात घडलेला हा प्रकार जगासाठी चिंतेचा आहे. तो केवळ एका देशाचा भाग नाही, तर संपूर्ण जगावर ज्या विचारसरणीने आपली हुकूमत अमानवी पद्धतीने गाजवण्याचा इतिहास केला आहे; ती विचारसरणी पुन्हा मानव समाजात रुजू नये किंवा तिचा उदय होऊ नये, याची जबाबदारी जगातल्या सर्व देशांवर येऊन ठेपली आहे!

COMMENTS