Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिना राष्ट्रवादी आणि टिळकांचे होते भक्त

रणजीत सावरकरांचे वक्तव्य ; मनसेप्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट

मुंबई प्रतिनिधी - राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु झाली असून, राहुल गांधी, राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शनिवारी स्वा

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?
उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर
राज ठाकरेंचे ट्वीट; शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.

मुंबई प्रतिनिधी – राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु झाली असून, राहुल गांधी, राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शनिवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांचे नातू यांनी बॅरिस्टर जिना राष्ट्रवादी होते, असे वक्तव्य केले. सावरकर वादात आता जिना यांचाही प्रवेश झाला आहे.  
रणजित सावरकर यांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सावरकर यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या प्रसंगी मनसे नेते आणि स्मारकाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना सावरकर म्हणाले की, मोहम्मद अली जिना हे पूर्वी राष्ट्रवादी होते. लोकमान्य टिळकांचे भक्त होते. जिना यांना काँग्रेसच्या व्यासपीठावरून हाकलून दिले गेले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या जिनांनी त्या काळातील काँग्रेस नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. यानंतर ते मुस्लिम लीगमध्ये सामील झाले. मुस्लीम लीगमध्ये सामील झाल्यानंतर जिना जातीवादी झाले. रणजीत सावरकर यांनी जिना यांना राष्ट्रवादी म्हणताना महात्मा गांधींनी अनेक चुका केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. रणजीत सावरकर म्हणाले, 1920 मध्ये महात्मा गांधींनी देशासाठी काहीही मागितले नाही. डोमिनियन स्टेटचा दर्जाही मागितला नाही. स्वातंत्र्याच्या मागणीचा उल्लेखही केला नव्हता. सावरकरांनी सुरुवातीपासूनच देशाच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती आणि ते डोमिनियन स्टेटच्या दर्जापर्यंत आले होते. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की, शांततेच्या मार्गाने वाटचाल करून आपण पुढे पूर्ण स्वातंत्र्य मिळवू. असा दावाही रणजीत सावरकरांनी केला. रणजीत सावरकर म्हणाले, वीर सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य करण्याची राहुल गांधींना जुनी सवय आहे. 2017 मध्येही त्यांनी असेच विधान केले होते. असे वक्तव्य केल्यानंतर ते वर्ष-दीड वर्ष गप्प बसतात. यापूर्वीही त्यांनी असेच विधान केले होते, त्यानंतर मी 2017 मध्ये गुन्हा नोंदवला आणि त्याला पोलिस चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास भाग पाडले होते, असे सावरकर यांनी सांगितले.

नेहरूंच्या कार्यकाळात गोपनीय माहिती ब्रिटिशांपर्यंत पोहचवली –   नेहरूंचा पुनर्जन्म राहुल गांधी म्हणून झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या चुका उघड करणे ही माझी जबाबदारी बनली आहे. नेहरूंच्या कार्यकाळात 12 वर्षे भारताची गोपनीय माहिती ब्रिटीशांपर्यंत पोहोचत राहिली. जर आम्ही आता प्रश्‍न विचारले नाहीत, तर भविष्यात देशाची माहिती इटलीला पाठवली जाईल, अशा शब्दांत रणजित सावरकर यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे.

COMMENTS