Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माऊली वृद्धाश्रमात वाचन संस्कृतीला प्राधान्य देणार – सुभाष वाघुंडे

शुभम नामेकर यांनी नियोजन केले. प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले.

श्रीरामपूर प्रतिनिधी - पुस्तकामुळे मन आणि संस्कृतीचे भरणपोषण होते, त्यामुळे माऊली वृद्धाश्रमात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ’माऊली ग्रन्थालय’ निर्

नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स ; घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी
श्री रामेश्‍वर विद्यालय वारीच्या विद्यार्थिनींनी दिला दातृत्वाचा संदेश
कोपरगावात शिवसेना ठाकरे गटाकडून जिजाऊंना अभिवादन

श्रीरामपूर प्रतिनिधी – पुस्तकामुळे मन आणि संस्कृतीचे भरणपोषण होते, त्यामुळे माऊली वृद्धाश्रमात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ’माऊली ग्रन्थालय’ निर्माण केले असून ह्या ग्रन्थालयासाठी पुस्तके पाठवावी असे आवाहन वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे(Subhash Waghunde) यांनी केले. येथील माऊली वृद्धाश्रमात ’ग्रन्थ हेच गुरु’आणि तेच खरे  प्रगतीचे साधन या विषयावर परिसंवाद प्रा.शिवाजीराव बारगळसरांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजन करण्यात आले.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपली 25पुस्तके सुभाष वाघुंडे यांना सुपूर्द करून ग्रन्थालयास शुभेच्छा व्यक्त केल्या, प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी 2000रुपये रोख स्वरूपात प्रदान केले.नंतरच्या झालेल्या कार्यक्रमात  अध्यक्षस्थानी माजी तहसीलदार गुलाबराव पादीर होते. स्वागत, प्रास्ताविक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून हे ग्रन्थालय वाढविण्यासाठी पुस्तक परिसंवाद, कविसंमेलन, पुरस्कार, साहित्यसंमेलन घेणार असल्याची माहिती दिली. सुभाष वाघुंडे यांनी मान्यवर पाहुणे, प्रा.बारगळ यांचे शाल, बुके,औक्षण करून सत्कार केले.यावेळी प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य टी. ई. शेळके,प्राचार्य शन्करराव अनारसे, प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, सुखदेव सुकळे, आरोग्यमित्र भीमराज बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. माजी तहसीलदार गुलाबराव पादीर अध्यक्षीय भाषणात म्हणाले, प्रा. शिवाजीराव बारगळ हे समाजसेवी व्यक्तिमत्व असून त्यांनी वाढदिवसानिमित्ताने माऊली ग्रन्थालयासाठी पुस्तके आणि आर्थिक देणगी दिली हे प्रेरणादायी आहे. आपण या वृद्धाश्रमासाठी मनापासून मदत करावी असे आवाहन केले. शुभम नामेकर यांनी नियोजन केले. प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले.

COMMENTS