राज्य सरकार काढणार सर्व प्रकल्पांची श्‍वेतपत्रिका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य सरकार काढणार सर्व प्रकल्पांची श्‍वेतपत्रिका

उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : राज्यातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राज्यातील राजकारण यामुळे ढवळून निघालं आहे.

‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था
“आम्ही मुलांना जेवण दिले, तुम्ही नाही – रोमानिया” व्हिडीओ व्हायरल | LOKNews24
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी मुलावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार

मुंबई : राज्यातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राज्यातील राजकारण यामुळे ढवळून निघालं आहे. मात्र खरं कोण खोटं कोण याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहेत. मात्र राज्य सरकार आता सर्व प्रकल्पांची श्‍वेत पत्रिका काढणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samantha) यांनी दिली आहे.
गेलेल्या प्रोजेक्टची आम्ही श्‍वेतपत्रिक काढण्याचे आम्ही आदेश देत आहोत. परदेशातून किती प्रकल्प आले, करार झाले याची माहिती आम्हाला कळेल. नागरिकांनी देखील माहितीच्या अधिकारात माहिती मागवावी. विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण वेगवेगळ्या बातम्या ट्वीट घेऊन बसत आहेत, मात्र मी पुरावा घेऊन बसलोय. पूर्वी आणलेले प्रकल्प आम्ही आणले असे मी कधीही म्हटले नाही. उलट मी असे सांगितले गाजावाजा करत जे प्रकल्प आले, त्यांची अमंलबजावणी का झाली नाही. कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग 14 महिने का झाली नाही, अशी विचारणा करत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. आदित्य ठाकरेंनी राजीनामा मागावा आणि आम्ही द्यावा, ऐवढे आम्ही दुबळे नाही. दोन हजार कोटींचा प्रकल्प आला म्हणून आम्ही थांबलो नाही. आणखी 20 हजार कोटींचे प्रकल्प आम्ही आणू. वेदांता, एअरबस, सॅफ्रन का गेला याचा खुलासा करायला हवा. जे प्रकल्प गेले त्याची श्‍वेतपत्रिका काढूच पण इतर महाविकास आघाडी सरकारमध्ये किती प्रोजेक्ट आले याचीही माहिती देऊ, असे उदय सामंत यांनी सांगितले. उद्योजक महाराष्ट्रात येतील असे वातावरण असावे, मात्र कुठेतरी सरकारची बदनामी केली जात आहे. माझा राजीनामा मागणे सोपे आहे, मात्र डावोजला जाऊन आपण किती उद्योग आणले किती पैसे खर्च केला, याचा हिशोब द्या. मी सर्वांचे गैरसमज दूर करेन. मी माझ्या विभागाला सांगून ठेवले की, कुणालाही पत्र पाहायची असतील तर ती पाहुद्या. आम्ही आरोप करण्यासाठी जागा ठेवणार नाही असे काम करू, असं उदय सामंत यांनी म्हटले आहे.

COMMENTS