सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या एसटी बसला भीषण आग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या एसटी बसला भीषण आग

सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी नाही

नाशिक प्रतिनिधी - नाशिक(Nashik) मध्ये एका खासगी बसला आग लागून मोठी दुर्घटना घडल्याची घटना ताजी असतानाच, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये स

स्मशानभूमीत पार पडला आगळा वेगळा विवाह सोहळा
आदित्य च्या सहा विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड
फुलाई नगर भागातील कालींदेश्वर मंदिराची सर्वेक्षणाची जिल्हाधिकार्‍याकडे मनसेची मागणी

नाशिक प्रतिनिधी – नाशिक(Nashik) मध्ये एका खासगी बसला आग लागून मोठी दुर्घटना घडल्याची घटना ताजी असतानाच, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडा(Saptshringi Fort) वर जाणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली. ही बस गडावर भाविकांना घेऊन जात होती. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. दरम्यान,एसटी बसला आग लागल्याची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

COMMENTS