Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार

कराड / प्रतिनिधी : देशपातळीवर कार्यरत असलेल्या ‘इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेलॉजिस्ट’ या भूलतज्ज्ञांच्या संघटनेच्या स्थापनेचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष सा

माण तालुक्यात नवजात अर्भकास फेकून दिल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल
तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, १८ जून २०२१ l पहा LokNews24
इस्लामपूर पालिका राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजीमुळे ’विकास आघाडी’ रिचार्ज

कराड / प्रतिनिधी : देशपातळीवर कार्यरत असलेल्या ‘इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेलॉजिस्ट’ या भूलतज्ज्ञांच्या संघटनेच्या स्थापनेचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काढण्यात आलेल्या देशव्यापी मशाल यात्रेचे आगमन बुधवार, दि. 5 कराडमध्ये होणार आहे, अशी माहिती भूलतज्ज्ञ संघटनेच्या कराड शाखेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत मोहिते व सचिव डॉ. श्रध्दा बहुलेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ज्ञांचे असलेले महत्व अधोरेखित व्हावे, तसेच उत्तम आरोग्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी ‘इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेलॉजिस्ट’ या भूलतज्ज्ञांच्या संघटनेच्यावतीने 2 ऑक्टोंबरपासून देशाच्या विविध भागातून देशव्यापी मशाल यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आहे. देशभरातून निघालेल्या या मशाल यात्रा 262 शहरांतून प्रवास करणार आहे. 16 ऑक्टोंबरला दिल्ली येथे या यात्रेतून आलेल्या देशभरातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत जागतिक भूलशास्त्र दिन साजरा केला जाणार आहे.

COMMENTS