Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक बांधिलकी जपणारे जादूगार हांडे फाउंडेशन – कुलकर्णी

अकोले प्रतिनिधी ः जादूगार पी.बी. हांडे सोशल फाउंडेशन च्या वतीने 74वा प्रजासत्ताक दिन पोलीस निरीक्षक मिथुन. घुगे साहेब यांच्या हस्ते झेंडावंदन करू

मनापासून केलेल्या कामातच देव भेटतो – भास्करराव पेरे पाटील
पारनेर : अधिकाऱ्याला मारहाण ! CCTV त कैद
कोपरगाव बस आगारात वरिष्ठांच्या खुर्च्या रिकाम्या

अकोले प्रतिनिधी ः जादूगार पी.बी. हांडे सोशल फाउंडेशन च्या वतीने 74वा प्रजासत्ताक दिन पोलीस निरीक्षक मिथुन. घुगे साहेब यांच्या हस्ते झेंडावंदन करून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी साऊ एकल महिला समितीच्या प्रतिमा कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना घुगे म्हणाले की, जादूगार हांडे फाउंडेशन व हांडे दाम्पत्य सतत समाजाभिमुख उपक्रम राबवितात, अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचा सततचा प्रयत्न असतो त्यांचे काम समाजासाठी व युवकांसाठी प्रेरणादायी असते. प्रतिमा कुलकर्णींनी खर्‍या अर्थाने हांडे कुटुंब प्रजासत्ताक दिन घराघरात साजरा करण्याची संकल्पना राबवत आहेत असे समाधान व्यक्त केले. तसेच विधवा महिलांसाठी ते करत असलेल्या कामाविषयी उपस्थितीत्ताना अवगत केले. आपण समाजाचे देणे लागतो त्यातून उतराई होण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करीत असल्याचे जादूगार हांडे यांनी नमूद केले सदर प्रसंगी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मंदाकिनी हांडे यांनी प्रबोधन गीते सादर केली तसेच संस्थेच्या वतीने नामवंत खेळाडूंचा  यथोचित सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तू धान्याचे कीट देण्यात आले.*जादु जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जादुगार हांडे  तसेच काव्य कारकीर्द व त्यांचे गीत चित्रीकरण. झाल्याबद्दल मंदाकिनी हांडे यांचा मान्यवराकडून सन्मानीत करण्यात आले. विविध उपक्रमाने साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास सोमनाथ नवले, दिलीप सेंणकर, भाऊसाहेब मंडलिक ,मनोहर तळेकर, प्रमोद मंडलिक, एस आर शेटे, मेजर भास्कर तळेकर बंगाळ, के.टी. मंडलिक, माधव आरोटे, इत्यादी मान्यवरांसोबत अकोले होमगार्डचे युनिट व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शानदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जादूगार हांडे यांनी केले तसेच या सोहळ्याचे सुंदर सूत्रसंचालन पुष्पा नाईकवाडी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस.टी .चासकर यांनी केले.

COMMENTS