संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

सव्वा लाखाच्या रोकडसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर शहरातील शिवाजीनगर परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा पोलिसांनी छापा टाकून सव्वा लाखाच्या रोकडसह साडेपाच लाख रु

काळानुरूप टपाल सेवेतही बदल ः अर्णव कंक्राळे
रेखा जरे हत्याकांडाची लवकरच नियमित सुनावणी…
तांदळेश्‍वर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर शहरातील शिवाजीनगर परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा पोलिसांनी छापा टाकून सव्वा लाखाच्या रोकडसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एकूण 11 जणांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशावरून घारगावच्या पोलीस निरीक्षकांनी ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत मिळालेला अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहराच्या शिवाजीनगर भागात पुणे नाशिक मार्गावर असलेल्या हॉटेल लकी शेजारील एका तीन मजली इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर तिरट नावाचा हार-जीतीचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. यावेळी एकूण एक लाख 21 हजार 500 रुपये रोख, 3 लाख रुपये किंमतीची मारुती स्विफ्ट (क्र.एम.एच 17/ए.झेड 0300), 60 हजार रुपये किंमतीची पल्सर मोटरसायकल (क्र.एम.एच. 17/बी.ई 6843), प्रत्येकी 30 हजार किंमत असलेल्या दोन पॅशन प्रो क्रमांक अनुक्रमे (एम.एच 17/ए.ए 5082) व (एम.एच 17/बी.एच 572) आणि एक 30 हजार रुपये किंमतीची कावासाकी मोटरसायकल (क्र.एम.एच 15/एक्स 4388) असा एकूण 5 लाख 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी पो.ना. यमुना जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी 11 जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम 4 व 5 नुसार कारवाई करून त्यांची जामीनावर सुटका केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये आकाश गोडगे (वय 27) व गणेश धामणे (वय 37, दोघेही रा.इंदिरानगर), शुभम शिंदे (वय 27), सचिन मंडलिक (वय 30, रा.खांडगाव), प्रवीण जगदाळे (वय 30, रा. गोल्डन सिटी), निलेश काळे (वय 34, रा.कोल्हेवाडी रोड), रवींद्र म्हस्के (वय 36) व सनी पवार (वय 18, दोघेही रा. मालदाड रोड), प्रतीक जाजू (वय 28) व दीपक फटांगरे (वय 35, दोघेही रा.गणेश नगर), राहुल शिंदे (वय 24, रा.शिवाजीनगर) अशा एकूण 11 जणांवर वरील कायद्यान्वये कारवाई करून त्यांची जामिनावर सुटका केली आहे.

COMMENTS