मुंबई : येत्या दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच राज्यात 20 हजार रिक्त पोलिसांची भरती होईल. 8 हज
मुंबई : येत्या दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच राज्यात 20 हजार रिक्त पोलिसांची भरती होईल. 8 हजारांची एक जाहिरात आधीच निघाली आहे, आता 12 हजारांची जाहिरात लवकर काढू. या भरतीमुळे पोलिस विभागावरील मोठा ताण कमी होईल,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी सायबर सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस यावेत यासाठी काही सुधारणा केल्या जातील अशी देखील माहिती यावेळीफडणवीस यांनी दिली.
जेल विभगात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. सध्या जेलधील 1641 कैद्यांची बेल झालेली आहे. परंतु, बेल बॉन्डसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते जेलमध्ये आहेत. अशा कैद्यांना कायदेशीर मदत करून त्यांना जेलमधून बाहेर कसे काढायचे यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरून महाविकास आघाडीवर टीका केली. संबंधित कंपनीला महाविकास आघाडीच्या सरकारने प्रकल्पासाठी जागा दाखवली नव्हती. शिवाय एकही कॅबिनेटची बैठक देखील घेण्यात आली नव्हती. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना आवश्यक असणारी जागा दाखवली होती. हा प्रकल्प गुजरातला जातोय असे समजल्यानंतर आम्ही कॅबिनेटची बैठक घेतली आणि गुजरातपेक्षा जास्त सुविधा देत असल्याचे त्यांना सांगितले. कॅबिनेटीमधून मंजूर केलेले पॅकेज देखील आम्ही त्यांना दाखवले. महाविकास आघाडीच्या काळात वेदांत प्रकल्पाबाबत काहीच झालं नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.
COMMENTS