राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका

नवनीत राणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा - मलन्ग शहा

 अमरावती प्रतिनिधी : अमरावतीमध्ये कथित लव्ह जिहाद प्रकरणामुळे खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि रवी राणा(Ravi rana) वादात सापडले आहे. या प्रकरणाती

असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा
नवनीत राणांविरोधात 100 कोटींचा दावा
नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल

 अमरावती प्रतिनिधी : अमरावतीमध्ये कथित लव्ह जिहाद प्रकरणामुळे खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि रवी राणा(Ravi rana) वादात सापडले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने नंतर ज्या तरुणावर पळवून नेल्याचा आरोप केला होता, त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. राणा दाम्पत्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप तरुणाने कला आहे. कथित लव्ह जिहार प्रकरणामुळे चार दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा केला होता. अखेर खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावती येथील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. आज खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात सोहेल शहा या तरुणाचे वडील यांनी केली तक्रार दाखल केली होती. या तक्रारी वरून पोलिसांनी कलम 500 बदनामी करणे आणि कलम 506 धमकी देणे अशी कलम लावली आहे. मात्र विनाकारण नवनीत राणा यांनी ‘माझ्या मुलावर लव्ह जिहादचे आरोप करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेले अदखलपात्र गुन्हे वाढवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्या तरुणांच्या वडिलांनी केली आहे.

COMMENTS