छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा नौदलाच्या ध्वजावर.

Homeताज्या बातम्यादेश

छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा नौदलाच्या ध्वजावर.

स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.

१९४७ साली ब्रिटिश गेले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र ब्रिटिशांच्या पाऊलखुणा पुसण्यासाठी तब्बल ७५ वर्षांचा मोठ्ठा कालावधी लागला. या ७५ वर्षांत

राज्यभरात दहीहंडीचा थरार
आ.आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त कारेगावमध्ये सामाजिक उपक्रम
आरक्षण यात्रा आणि ओबीसी !

१९४७ साली ब्रिटिश गेले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र ब्रिटिशांच्या पाऊलखुणा पुसण्यासाठी तब्बल ७५ वर्षांचा मोठ्ठा कालावधी लागला. या ७५ वर्षांत चार वेळा भारतीय नौदलाच्या ध्वजाला नवं रूप देण्यात आलं. परंतु ब्रिटिश राजवटीचं प्रतीक असणाऱ्या दोन लाल रंगाच्या रेषा अर्थात सेंट जॉर्ज क्रॉस काही ध्वजावरुन हटण्याचे नावाच घेत नव्हता . शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Prime Minister Narendra Modi) च्या हस्ते स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत(INS Vikrant) नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. त्याबरोबरच नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात आलं. यंदा भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावरुन ब्रिटिशांच्या सर्व प्रकारच्या खुणा काढून टाकण्यात आल्या आहेत. या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असणे ही भूषणावह बाब आहे. अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह या ध्वजावर अंकित करण्यात आलं आहे. यावेळी छत्रपतीं शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन हा ध्वज तयार करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

नौदलाचा नवा ध्वज असा आहे. डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे. तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये सोनेरी रंगात अशोकस्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आला आहे. या अष्टकोनी आकाराला निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्याआतील किनार ही काहीशी बारीक आहे. छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी ही नक्षी तयार करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असं निळ्या रंगात लिहिण्यात आलं आहे. त्यासोबत नांगराच्या खाली ‘सम नो वरुनाह’ हे नौदलाचं ब्रीदवाक्य लिहिण्यात आलं आहे.

COMMENTS