पढेगावला बिबट्याची मादी जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पढेगावला बिबट्याची मादी जेरबंद

कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील पुर्व भागात असलेल्या पढेगावला बिबट्या आढळून आल्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नवरात्री उत्सवापासु

नगर मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक
Ahmednagar : रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी -आ.संग्राम जगताप | Lok News24
सर्वोदय विद्यालयाचे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धांत नेत्रदीपक यश

कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील पुर्व भागात असलेल्या पढेगावला बिबट्या आढळून आल्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नवरात्री उत्सवापासुन गावात तळ ठोकून बसलेल्या बिबट्याने अनेक कुत्र्याची पिल्ले आणि कुत्री फस्त केली होती. अनेकांनी बिबट्याच्या पावलांची ठशे आणि प्रत्यक्ष बिबट्याही बघितला यामुळे गावात दहशतीचे वातावरण होते. याबाबत वनविभागाशी संपर्क केला असता कर्मचार्‍यांची वानवा असल्याने दोन तिन दिवस गेल्यानंतर अखेर सोमवारी पिंजरा लावण्यात आला.बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्याची मादी पिंजर्‍यात जेरबंद झाली.
गावातील ज्ञानदेव शिंदे यांचे वस्तीवर बिबट्याने शेळी पकडली होती मात्र कुत्र्यांनी केलेल्या कांगाव्यात अर्धा तास तिथेच थांबुन नंतर बिबट्याने धूम ठोकली होती.तोच दुसर्‍या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास जवळच असलेल्या भानुदास शिंदे यांचे वस्तीवर त्यांच्या सुनेस बिबट्यासह चार पिल्ले निदर्शनास आली होती.त्यामुळे गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. बिबट्याच्या दहशतीमुळे काढणीला आलेली खरीपाची पिके आणि धान्य तयार करण्याची लगबग असताना रात्री घरातून बाहेर पडावे की नाही याची सर्वांना चिंता सतावत होती. मात्र आता बिबट्याच्या मादिला पकडण्यात यश आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला असून आता वनविभागापुढे या मादिच्या पिल्लांचा शोध घेण्याचे आव्हान आहे. याबाबत वनविभागाचे कर्मचारी शेतकर्‍यांच्या मदतीने पिल्लांसाठी आसपास शोध मोहीम राबवणार आहे.

COMMENTS