Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतण्याचा मृत्यू

पंढरीनाथ काळे आणि रितेश काळे अशी मृत काका पुतण्याची नावे

औरंगाबाद प्रतिनिधी - राज्यभरात आज बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत आहे. मात्र, फुलंब्री तालुक्यात बैलपोळ्याच्या सणाच्या उत्साहावर विरजण टाकणारी

सरपंचाच्या पतीचा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आदिवासींना शिवीगाळ !
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार
 बंदी असूनही गुटख्याचा साठा करणाऱ्या दोघांना दौलताबाद पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद प्रतिनिधी – राज्यभरात आज बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत आहे. मात्र, फुलंब्री तालुक्यात बैलपोळ्याच्या सणाच्या उत्साहावर विरजण टाकणारी घटना घडली आहे. याठिकाणी सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या काका आणि पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंढरीनाथ कचरू काळे (वय – ३३) आणि रितेश अजिनाथ काळे (वय-१८) अशी मृत काका पुतण्याची नावे आहेत. हे दोघेही पोळ्याच्या सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाझर तलावाच्या काठावर घेऊन गेले होते. मात्र, बैलाने धक्का दिल्याने काका पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला पुतण्या देखील पाण्यात बुडाला. पोळ्याच्या पूर्वसंध्येला एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS