विधानभवना समोर आत्मदहनाचा प्रयत्न.

Homeमहाराष्ट्र

विधानभवना समोर आत्मदहनाचा प्रयत्न.

सुभाष भानुदास देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये केले दाखल

पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेतले. स

रुग्‍णांमधील लक्षणे समजून योग्‍य उपचार करा
डीसीसी बँकेतील पैसे वारसाला मिळावे,यासाठी बँकेच्या विरोधात पतुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण सुरू | LOKNews24
परभणी घटनेची न्यायालयीन चौकशी ; बीड घटनेची न्यायालयीन व एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी

पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेतले. सुभाष भानुदास देशमुख (वय 55) असे या शेतकऱ्याचे नाव असून ते धाराशिवचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

COMMENTS