Homeताज्या बातम्यादेश

सावध व्हा! बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे होतोय आधार स्कॅम

सरकारकडून रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली : आधार कार्डाचा गैरवापर केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु आता यावर अंकुश ठेवण्यासाठी, तसेच आधारचा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकार

लातूरमध्ये अवकाळीचा कहर, वीज पडून एकाचा मृत्यू
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे तीन दिवसीय संविधान साक्षरता निवासी कार्यशाळा
आरोग्य भरती परीक्षेचा नियोजनाचा उडाला बोजवारा ; ऐनवेळी पुणे, नाशिक केंद्रावर प्रश्‍नपत्रिकांची टंचाई

नवी दिल्ली : आधार कार्डाचा गैरवापर केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु आता यावर अंकुश ठेवण्यासाठी, तसेच आधारचा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकार कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. आधार कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्याचा दुरुपयोग किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे होऊ शकते. त्यामुळे भारत सरकारने आधार युजर्ससाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, UIDAI ने ट्विटरवर युजर्सना सध्या होत असलेल्या स्कॅमबद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आधार कार्ड अपडेट करण्याचा ई-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आल्यास सावध राहा आणि अशा कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नका. या बनावट मेसेजद्वारे स्कॅमर व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज किंवा ईमेलवर कागदपत्रे शेअर करण्यास सांगत आहेत, त्यामुळे अशा मेसेजला उत्तर देणे टाळा. तसेच, तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करायचे असल्यास तुम्ही अधिकृत साइटवर जाऊन ते करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रावरही जाऊ शकता.

UIDAI ने ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, ई-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI तुमची POI/POA कागदपत्रे कधीही शेअर करण्यास सांगत नाही. तर myAadhaarPortal द्वारे तुमचे आधार ऑनलाइन अपडेट करा किंवा तुमच्या जवळच्या आधार केंद्रांना भेट द्या. दरम्यान, UIDAI ने कागदपत्रांचे मोफत आधार अपडेट 14 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवले ​​आहे. यापूर्वी ही मोफत सेवा केवळ 14 जून 2023 पर्यंत होती. अशाप्रकारे आधार कार्डमधील डिटेल्स अपडेट करा….- यासाठी आधी अधिकृत आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा.- आता येथे तुमचा आधार क्रमांक आणि OTP टाइप करून लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला जे डिटेल्स अपडेट करायचे आहे, ते शोधा.- आता तुमचा फॉर्म एकदा तपासा आणि सबमिट करा.- ट्रॅकिंगसाठी URN मिळवा, URN हा 14 अंकी क्रमांक आहे, जो आधार डिटेल्स अपडेट करताना दिला जातो.- यानंतर, आवश्यक असल्यास, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी आधार इनरॉलमेंटवर जा.- आता तुम्हाला योग्य डिटेल्ससह अपडेट केलेले कार्ड मिळेल

COMMENTS