Homeताज्या बातम्या

पुण्यात भर रस्त्यात महिला पोलिसाकडून हमालाला मारहाण

पोलिसावर कारवाईची मागणी

पुणे प्रतिनिधी-  लोणी काळभोर परिसरातील उरुळी कांचन येथील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गरीब हमालाला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार

महिला पोलिसांना मोठा दिलासा… राज्यात कामाच्या वेळेत कपात
बीडमध्ये पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या
माजलगाव शहर पोलीस कर्मचार्‍याला 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे प्रतिनिधी-  लोणी काळभोर परिसरातील उरुळी कांचन येथील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गरीब हमालाला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. किशोर निवृत्ती गरड (वय ३५) असे मारहाण करण्यात आलेल्या हमालाचे नाव असून भारती होले असं महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्या उरुळी कांचन येथील पोलीस चौकीत कार्यरत आहेत.शिंदवणे गावाच्या रस्त्यावर एक किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात हमाल गरड हे माल उतरवत होते. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याने गरड यांना रस्त्यात टेम्पो का उभा केला, असं विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे.

COMMENTS