पुण्यात पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

Homeताज्या बातम्या

पुण्यात पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

पुणे : देशी बनावटीचे ३ पिस्टल, ९ जिवंत काडतुसे, ३ मॅक्झिन विक्री बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने जेरबंद केले. आरोप

संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश सुविधा केंद्र
राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण ; प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार उद्घाटन
कोल इंडियाचे सुदृढीकरण आवश्यक !

पुणे : देशी बनावटीचे ३ पिस्टल, ९ जिवंत काडतुसे, ३ मॅक्झिन विक्री बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने जेरबंद केले. आरोपीकडून ०३ पिस्टल,०९ जिवंत काडतुसे, ४ सुट्टे मॅगझिन व एक इर्टीगा गाडी असा एकूण सहा लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अजय ऊर्फ महाराज कमलाकर भोरे (वय २८, रा. के ऑफ दुबे निवास, आनंदनगर चौकाजवळ, मुंढवा, पुणे) आणि ओंकार प्रदीप कांबळे (वय २२, रा. काकरंबा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपींवर चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२चे अधिकारी व अंमलदार गस्त करत असताना खराडी येथे दोघेजण पिस्टल विक्रीकरिता थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले.

COMMENTS